मनोज एल खोब्रागडे
✍🏻मुख्य संपादक✍🏻
8208166961/9860020016
चंद्रपूर :- सविस्तर माहिती याप्रमाणे आहे की दि. 10 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजेदरम्यान
हवेली गार्डन परिसरात नालीच्या स्लॅबवर स्कूल बस गेल्याने 15 दिवसांपूर्वी बांधकाम झालेल्या नालीचा स्लॅब खचल्याची बाब सामाजिक कार्यकर्ते श्री. रवी जोगी व इतर सजग नागरिकांनी निदर्शनास आणून दिली.
दुपारी 4 वाजता झालेल्या महानगरपालिकेच्या स्थायी समिती बैठकीत या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली व बैठक झाल्यानंतर तातडीने संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याबाबतचे पत्र देण्यासाठी मनपा प्रशासनाला भाग पाडले.
अवघ्या 3 तासात कंत्राटदाराविरुद्ध नियमानुसार कारवाई सुरू करण्यात आली.
निकृष्ट व भ्रष्ट कामे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेणार नाही! असे आव्हाहन यावेळी करण्यात आले.

Post a Comment
0 Comments