Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली होलेवाडी येथील कालव्याची पाहणी शेतकऱ्यांच्या हिताच्या कामांना गती देण्याचे निर्देश


मनोज एल खोब्रागडे 

✍🏻मुख्य संपादक ✍🏻

8208166961/986020016


अहिल्यानगर : - राज्याचे जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ)  तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज कर्जत तालुक्यातील होलेवाडी येथील कालव्याची प्रत्यक्ष पाहणी करून दुरुस्ती कामाचा आढावा घेतला. अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या कालव्याची तातडीने दुरुस्ती करण्यात आली असून, या कामाच्या गुणवत्तेची आणि प्रगतीची त्यांनी पाहणी केली.

सन २०२५-२६ मधील अतिवृष्टीमुळे होलेवाडी येथील कालव्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या सिंचन व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर संबंधित विभागामार्फत कालव्याच्या दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली होती. या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली.

यावेळी त्यांनी उपस्थित शेतकरी आणि ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी व सूचना जाणून घेतल्या. शेतीला आवश्यक असलेली सिंचन व्यवस्था सक्षम राहण्यासाठी कालव्यांची नियमित देखभाल व आवश्यक त्या दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करावीत, तसेच शेतकऱ्यांच्या हिताशी संबंधित विकासकामांना प्राधान्य देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

याप्रसंगी उपविभागीय अधिकारी नितीन पाटील, तहसीलदार रवी सत्वन, अधीक्षक अभियंता अलका अहिरराव तसेच संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी, शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments