मनोज एल खोब्रागडे
✍🏻मुख्य संपादक ✍🏻
8208166961/9860020016
नागपूर :- वसई विरार शहर महानगरपालिकेचे महापौर श्री. अजीव पाटील यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने नागपूर महानगरपालिकेच्या महापौर श्रीमती निता ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी मनपाद्वारे शहरात सुरू असलेल्या विविध विकास कामांसह विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तत्पूर्वी शिष्टमंडळाने भांडेवाडी येथील भूमी ग्रीन एनर्जी एन्व्हायरोकेअर एलएलपी कंपनीच्या घनकचरा कचरा प्रक्रिया केंद्राला भेट देत प्रकल्पाची माहिती जाणून घेतली.
सदिच्छा भेटीदरम्यान मनपाच्या स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे, सत्तापक्ष नेते श्री. नरेंद्र(बाल्या) बोरकर, मनपा आयुक्त डॉ. विपीन, अतिरिक्त आयुक्त श्री मुरुगानंथम एम., वसई विरार शहर महानगरपालिकेचे उपमहापौर श्री. मार्शल लोपीस, स्थायी समिती सभापती श्री.प्रवीण शेट्टी, सभागृहनेते श्री. प्रफुल्ल साने, विरोधीपक्ष नेते श्री. मनोज पाटील, आरोग्य समिती सभापती श्री. निलेश देशमुख, गटनेता श्री.अशोक शेळके, श्री. नारायण मानकर, श्री. निशाद चोरघे, श्री. राजेश नाईक, अतिरिक्त आयुक्त श्री. संजय हेरवाडे, सहायक आयुक्त श्री. जितेंद्र नाईक, एआयआयएलएसजी सल्लागार श्री. श्रुतीसागर पाटील, कनिष्ठ अभियंता श्री. सचिन तांडेल, मनपाच्या आरोग्य विशेष समिती सभापती श्रीमती मनिषा अतकरे, ज्येष्ठ नगरसेवक श्री. सुधीर (बंडू) राऊत, श्री. विजय (पिंटू) झलके यांच्यासह अतिरिक्त आयुक्त श्री. मिलिंद मेश्राम, उपायुक्त श्री. निर्भय जैन, उपायुक्त श्री. राजेश भगत, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, कार्यकारी अभियंता श्री. राजेश दुफारे, यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments