व्येकटेश चालुरकर
तालुका प्रतिनिधी अहेरी
9209982212
अहेरी तालुक्यातील सीएसओ बायफ नागपूरच्या अधिकाऱ्यांनी दोन दिवसीय दौऱ्यात येरमनार, गुरजा, मेडपल्ली, अलापल्ली व अहेरी येथील विविध प्रकल्पावर भेटी देऊन प्रकल्पात सुधारणा, नियोजन व अंमलबजावणी बाबत शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन केले.
गुर्जा या गावात मनरेगांमधून लाभार्थी सामा डुगा गावडे यांना मिळालेल्या सिंचन विहीर, फळबागाची पाहणी, त्याच विहिरीवर मिळालेला थ्री एचपी चा सोलर पंप, गांडूळ बेड, को फायनान्स मधून झालेली बोडी, त्यातील मत्स्यपालन तसेच शेतकऱ्याला उत्पन्न वाढविण्यासाठी झालेला लेअरिंगच्या कामाची प्रशंशा टीम प्रमुख डेहनकर यांनी केली.
को फायनान्स मधून करण्यात आलेल्या बोडीच्या कामाची पाहणी करून लिवरेजमध्ये कशाप्रकारे घ्यायचे यावर चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले.
येरमनार येथे पोच्या तलांडे यांच्या उपक्रमांची पाहणी करण्यात आली. यामध्ये नर्सरी, गोट युनिट, भाजीपाला लागवड, गोट शेडच्या वाढीसाठी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच मनरेगा मधून चंदू तलांडी या बोडी लाभार्थ्याला समुपदेशन करण्यात आले.
मेडपल्ली येथील संतोष पेंदामाच्या मच्छ संगोपन पालन विक्री युनिटला टीमने भेट देऊन मच्छसंगोपन व संवर्धन प्रशिक्षण चा फायदा,सुरुवात व व्यवसायाला लाभार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
आलापल्ली येथील लिवरेज वाढविणे. पोखरामध्ये शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी वाढविणे. शासकीय योजनांची अंमलबजावणी करणे, उत्पादक गट तयार करणे इत्यादी विषयावर पुणे प्रकल्पाचे संचालक दुधाळे,नागपूरचे भिडे, गडचिरोलीचे इंगोले व अहेरीच्या कोर टीमने मार्गदर्शन केले

Post a Comment
0 Comments