Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

सिंदेवाही येथे शेतकरी, कष्टकरी, महिला, विद्यार्थी आणि शेतमजुरांच्या विविध मागण्यांसाठीच्या भव्य जनआक्रोश महामोर्चा



मनोज एल खोब्रागडे 

✍🏻मुख्य संपादक✍🏻

8208166961/9860020016 

सिंदेवाही :- सिंदेवाही, जि. चंद्रपूर येथे तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित शेतकरी, कष्टकरी, महिला, विद्यार्थी आणि शेतमजुरांच्या विविध मागण्यांसाठीच्या भव्य जनआक्रोश महामोर्चाला आमदार विजुभाऊ वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत.

अन्याय, महागाई, बेरोजगारी आणि शेतकरी-कष्टकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांकडे डोळेझाक करणाऱ्या सरकारविरोधात आज सिंदेवाहीच्या रस्त्यावर जनतेचा संताप आणि आक्रोश एकवटलेला पाहायला मिळाला. जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून सत्ता चालवता येणार नाही! असा स्पष्ट इशारा हजारो नागरिकांनी एकजुटीने सरकारला दिला, 

शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम मिळालाच पाहिजे, कष्टकऱ्यांच्या श्रमाला सन्मान मिळालाच पाहिजे, महिलांना सुरक्षितता आणि न्याय मिळालाच पाहिजे, विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी आणि तरुणांना रोजगार मिळालाच पाहिजे. जनतेच्या हक्कांसाठी सुरू झालेला हा लढा आता अधिक तीव्र होईल. शेतकरी, कष्टकरी, महिला, विद्यार्थी आणि कामगारांच्या न्याय्य मागण्या मान्य होईपर्यंत हा संघर्ष थांबणार नाही.

जनतेच्या हक्कांसाठी काँग्रेसचा आवाज विधानसभेपासून रस्त्यापर्यंत बुलंद राहील आणि अन्यायाविरोधातील हा संघर्ष शेवटपर्यंत सुरूच राहील असे आस्वासन आमदार विजुभाऊ वडेट्टीवार यांनी यावेळी येथील जनतेला दिले.

Post a Comment

0 Comments