Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छांचा वर्षाव



त्रिशा राऊत नागपूर क्राईम रिपोर्टर मो 9096817953

उमरेड (प्रतिनिधी) - वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्ष नागपूर (ग्रामीण) चे जिल्हाप्रमुख, माजी तालुका प्रमुख उमरेड शिवसेना तथा महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा नागपूर (ग्रामीण) चे कार्याध्यक्ष श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांचा वाढदिवस आज उत्साहात साजरा करण्यात येत आहे.

सामाजिक व राजकीय क्षेत्रात नेहमी सक्रिय असणारे श्री. बावनकुळे यांनी वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून अनेक गरजू रुग्णांना मदत मिळवून दिली आहे. कोरोनापासून ते आतापर्यंत अनेकांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. सामाजिक क्षेत्रात 35 वर्षापासून सक्रिय असलेले गरिबाच्या दाता म्हणून ओळखणारे चंद्रशेखर बावनकुळे गरीब लोकांचे कैवारी असे बाळू भाऊ यांची प्रसिद्धी आहे.तैलिक समाजाच्या संघटनासाठी तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे.

त्यांच्या वाढदिवसानिमित्त उमरेड, नागपूर ग्रामीण भागातील विविध सामाजिक, राजकीय, धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी तसेच शिवसैनिक व तैलिक समाज बांधवांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून व फोनद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.

त्यांना उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

Post a Comment

0 Comments