अरविंद बेंडगा
पालघर जिल्हा प्रतिनिधी
7798185755
वसई : दरवर्षी ९ ऑगस्ट, जागतिक आदिवासी दिवसाचे औचित्य साधून देशभरातील गरीब, गरजू आणि अडचणीत असलेल्या कुटुंबांना मदत करण्याचे ध्येय वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनने ठेवले आहे. अडचणीत असलेल्या व्यक्तींच्या दुःखात सहभागी होऊन त्यांना आधार देण्याचा हा अनोखा सामाजिक उपक्रम असोसिएशनच्या माध्यमातून दरवर्षी राबविण्यात येतो.
यावर्षी डहाणू तालुक्यात अतिवृष्टी व पुरामुळे अडचणीत आलेल्या आदिवासी कुटुंबांना मदतीचा हात देण्यात आला. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष श्री. रघुनाथ जोगारी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकारी अविनाश ठाकरे , प्रशांत जाधव विक्री उराडे यांनी प्रत्यक्ष पूरग्रस्त कुटुंबांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कुटुंबांची परिस्थिती जाणून घेत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या.
पूरामुळे घरांचे तसेच संसारोपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या कुटुंबांना तातडीची आर्थिक मदत देऊन त्यांना आधार देण्याचे काम असोसिएशनच्या माध्यमातून करण्यात आले.
केवळ क्रिकेटच्या माध्यमातून खेळाडू घडविण्याऐवजी समाजातील गरजू घटकांच्या सुख-दुःखात सहभागी होऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचा आदर्श वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनने निर्माण केला आहे.
“खेळाकडून सामाजिक उपक्रमाकडे” या ब्रीदवाक्याला अनुसरून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमातून अडचणीत असलेल्या कुटुंबांना मदतीसोबतच मानसिक आधार देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
गरजूंच्या दुःखात सहभागी होऊन त्यांच्या अडचणीच्या काळात मदतीचा हात पुढे करणे, हाच खरा सामाजिक बांधिलकीचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
जय आदिवासी! जय जोहार!

Post a Comment
0 Comments