मनोज एल खोब्रागडे
✍🏻मुख्य संपादक ✍🏻
8208166961/9860020016
सिंदेवाही :- सर्वोदय कनिष्ठ विद्यालय आणि सीताबाई शेंडे विद्यालय, सिंदेवाही येथे आयोजित या उपक्रमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी आवश्यक असलेले शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याचा छोटासा प्रयत्न करण्यात आला. शिक्षणाच्या प्रवासात आर्थिक परिस्थिती अडथळा ठरू नये आणि प्रत्येक विद्यार्थ्याला शिकण्याची समान संधी मिळावी, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.
यावेळी आमदार विजय वडेट्टीवार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या शिक्षणाबाबतच्या आकांक्षा जाणून घेतल्या. शिक्षण हेच सक्षम आणि उज्ज्वल भविष्याची खरी पायाभरणी आहे; त्यामुळे विद्यार्थ्यांनी जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाने आपले ध्येय गाठावे, असे यावेळी आवाहन केले.
विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा उत्साह पाहून हा उपक्रम निश्चितच समाधान देणारा ठरला.

Post a Comment
0 Comments