गुरुनाथ तिरपणकर
मुंबई महानगर प्रतिनिधी
मो.9323662619
ओरस :- रविवार दिनांक ०९ ऑगस्ट २०२६ रोजी, महाराष्ट्र पत्रकार संघ मुंबई,कोकण बुक ऑफ रेकॉर्ड, यशश्री फाउंडेशन सिंधुदुर्ग आयोजित कोकण कला साहित्य गौरव संमेलन सिंधुदुर्ग नगरी ओरस येथे २०२६ आयोजित करण्यात आले .आणि या सोहळ्यामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या, सातत्याने समाज हिताचे कार्य करणाऱ्या संस्थांना, साहित्यिकांना, कलाकारांना , समाजसेवकांना सन्मान चिन्ह, मानपत्र,शाल देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले..
यात श्री सोमेश्वर कलामंच सामाजिक संस्था रजि सिंधुदुर्ग या संस्थेला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह, मानपत्र,आणि शाल देऊन कला गौरव पुरस्कार २०२६ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
श्री सोमेश्वर कलामंच सामाजिक संस्था सिंधुदुर्ग संस्था सातत्याने निस्वार्थीपणे सामाजिक कार्य करत आहे.
श्री सोमेश्वर कलामंच प्रस्तुत गराजलो रे गराजलो या नाटकाद्वारे जनजागृती करता करता प्रत्यक्षात १५ मुद्दे घेऊन गराजलो रे गराजलो ही एक चळवळ गेली अनेक वर्षे कार्यरत आहे.
कोकणातील भावी पिढीचा सर्वांगीण
विकास व्हावा यासाठी शाळा, हायस्कूल, काॅलेज मध्ये जाऊन व्यक्तीमत्त्व विकास कसा करावा यावर मार्गदर्शन करण्यात येत आहे.याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सहदेव धर्णे,सौ.कांचन धर्णे-गावडे, दत्तप्रसाद बांदिवडेकर उपस्थित होते.संस्थेला कोकण कला गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.

Post a Comment
0 Comments