Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

तळा शहरातील पुसाटीवाडी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला ढासळला.शिवसेनेचा मोठा धक्का!



पुसाटीवाडी ग्रामस्थांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश.


किशोर पितळे 

तळा तालुका प्रतिनिधी 

तळा :- तळा नगरपंचायत हद्दीतील पुसाटीवाडी येथे राष्ट्रवादी हा गेली२५वर्षे बाले किल्ला समजला जातो त्या पुर्वी शेकाप चा बालेकिल्ला गणला जात होता मात्र तालुक्यात शिवसेना शिंदे गटाचे वाढते वर्चस्व व विकास कामाचा झंझावात पाहता शिवसेनेने शहरासह ग्रामीण भागातील केलेला विकासाभिमुख कार्यपद्धतीवर प्रेरीत होऊन ग्रामस्थ, महिला मंडळ तसेच मुंबईकर मंडळातील कार्यकर्त्यांनी एकमताने निर्णय घेऊन१६आँगस्ट रोजी भगवा हातात घेऊन "जय शिवाजी जय भवानी"जयघोष करीत जाहीर प्रवेश केला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसला असून,बालेकिल्ला पुर्ण ढासळला आहे.

   रायगडजिल्ह्याचेपालकमंत्री ना.भरतशेट गोगावले यांच्या विकासाभिमुख कार्यपद्धतीवर विश्वास व्यक्त करीत,तळा शहरप्रमुख राकेश वडके यांच्या मार्गदर्शना खाली हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळीदक्षिण रायगड जिल्हा प्रमुख प्रमोदघोसाळकर,माजी जिल्हा प्रमुख रवी मुंढे,युवा सेना जिल्हाप्रमुख विपुल उभारे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुसाटीवाडी मंडळातील पदाधिकारी व ग्रामस्थांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला.यामध्ये मंडळ अध्यक्ष जयेश कातुर्डे, उपाध्यक्ष लक्ष्मण भांडे, सेक्रेटरी रामचंद्र कुळे, निलेश शिंदे, नितीन भांडे, तेजस भांडे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले.पुसाटीवाडी तील या सामूहिक पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी ची जमीन सरकलीआहे तळा नगरपंचायत परिसरातील राजकीय समीकरणांवर चर्चा रंगली आहे.आगामी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला मिळालेला हा प्रतिसाद राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे.

पुसाटीवाडीचा भगवा प्रवेश तळ्याच्या राजकारणात किती मोठा बदल घडवणार?असा कानोसा ऐकायला मिळतआहे

जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी भरतशेट गोगावले यांच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास वाढत असल्याचे सांगत, गावागावांत शिवसेनेला मिळणारा प्रतिसाद ही त्याचीच पावती असल्याचा दावा केला. कार्यक्रमाला तालुकाप्रमुख प्रद्युम्न ठसाळ, शहरप्रमुख राकेश वडके, जिल्हा कोअर कमिटी सदस्य लीलाधर खातू, युवासेना उपजिल्हाप्रमुख रितेश मुंढे, नगरसेवक नेहा पांढरकामे, नरेश सुर्वे, सिराज खाचे, नगरसेविका सुरेखा पवार, नगरसेवक मंगेश पोळेकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments