मनोज एल खोब्रागडे
✍🏻मुख्य संपादक ✍🏻
8208166961/9860020016
राजुरा :- सविस्तर माहिती याप्रमाणे आहे की खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी आज बामणी ते राजुरा राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेल्या सर्व्हिस रोड आणि पुलाच्या कामाची पाहणी केली. यावेळी पुलाची उंची अधिक झाल्यामुळे शेतकऱ्यांना शेतात ये-जा करण्यासाठी निर्माण होणाऱ्या समस्यांबाबत चर्चा करून त्यावर आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिले.
शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. विकासकामांसोबतच स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांच्या हिताचाही विचार होणे तितकेच महत्त्वाचे आहे. असे यावेळी खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी म्हटले.

Post a Comment
0 Comments