मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
आरमोरी :- तालुका काँग्रेस कमिटी आरमोरी तथा आमदार रामदासजी मसराम मित्रपरिवाराच्या वतीने भव्य महाआरोग्य तपासणी व चष्मे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरामध्ये हृदयरोग, हाडांचे आजार, स्त्रीरोग, नेत्ररोग यांसह विविध आजारांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. नागरिकांना आरोग्यविषयक आवश्यक मार्गदर्शन देण्यात आले. गरजू रुग्णांना औषधोपचार उपलब्ध करून देण्यात आले, तर नेत्र तपासणीनंतर गरजू लाभार्थ्यांना चष्म्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी उपस्थित राहून उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, ग्रामीण व सर्वसामान्य नागरिकांपर्यंत दर्जेदार आरोग्यसेवा पोहोचविणे ही आजच्या काळाची गरज आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने केवळ शुभेच्छा न देता समाजोपयोगी उपक्रम राबविण्याची परंपरा जोपासणे आवश्यक असून, अशा सेवाभावी उपक्रमांच्या माध्यमातून जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्याचे कार्य सातत्याने सुरू राहील.
यावेळी आरमोरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे,प्राचार्य डॉ. सचिन खोब्रागडे, सरपंचा संगीता पेंदाम, केशव गेडाम (माजी जि. प. सदस्य), धनपाल मिसार, परसराम टिकले, नितीन राऊत, दिलीप घोडाम, उपसरपंच भास्कर बोळणे, विनोद बावणकर (माजी पं. स. सदस्य), किरण मस्के (माजी पं. स. सदस्या), सागर वाढई, नगरसेवक माणिक भोयर, नगरसेवक अक्षय बागडे, संगीताताई मेश्राम, दत्तू सोमणकर, राज नंदरधने, दिगांबर धाईत, बनकर मॅडम, मुखरू खोब्रागडे, भाऊजी मडावी, अजय रामटेके, स्वप्नील ताडाम, तुकाराम वैरकर, माजी पी.आय. वरखडे सर, राजू आखरे, प्रीतम बनकर, सत्यदास आत्राम, मनोज सपाटे, आशुतोष भरणे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments