Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

जिल्ह्याच्या विकासाबाबत खा.प्रफुल पटेल व उद्योग मंत्री उदय सावंत यांच्यात चर्चा



✍️ भवन लिल्हारे भंडारा, गोंदिया जिल्हा प्रतिनिधी मो.नं.9373472847 / 8888519894

भंडारा : ( दिनांक २० जुलै २०२६ ) भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना शासकीय विश्रामगृह, भंडारा येथे राज्याचे उद्योग मंत्री नामदार श्री उदय सावंत यांनी खासदार श्री प्रफुल पटेल यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी जिल्ह्याच्या विकासाशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करून औद्योगिक विकास व विकासकामांना गती, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक सहकार्य आणि प्रलंबित विकासकामांना गती मिळावी, याबाबतही सकारात्मक चर्चा करण्यात आली. प्रलंबित विकास कामे जलद गतीने सुरू होईल अशी देखील चर्चा झाली.

यावेळी खासदार श्री राजेंद्र जैन, आमदार श्री नरेंद्र भोंडेकर, आमदार श्री राजूभाऊ कारेमोरे, शिवसेना नेते श्री किरण पांडव, श्री नानाभाऊ पंचबुद्धे, श्री धनंजय दलाल यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments