Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

दिल्ली येथील निवासस्थानी महात्मा फुले जयंती उत्सव समितीच्या शिष्टमंडळाने घेतली खासदार प्रतिभाताई धानोरकर यांची सदिच्छा भेट



मनोज एल खोब्रागडे 

✍🏻मुख्य संपादक✍🏻

8208166961/9860020016 


चंद्रपूर :-महात्मा ज्योतिबा फुले शिष्टमंडळाच्या वतीने

आज दिल्ली येथील निवासस्थानी महात्मा फुले जयंती उत्सव समितीच्या शिष्टमंडळाने सदिच्छा भेट घेतली. 

यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी महोत्सवानिमित्त 'पदचिन्ह' देऊन माझा सत्कार करण्यात आला, तसेच येत्या २० ऑगस्ट रोजी आयोजित महात्मा फुले उत्सव समितीच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आदरपूर्वक निमंत्रण देण्यात आले. या कार्यक्रमासाठी खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी आदरपूर्वक निमंत्रण स्वीकारले आहे. 

या भेटीदरम्यान इतर मागासवर्गीय घटकांच्या विविध न्याय्य हक्कांवर, अडचणींवर आणि महत्त्वपूर्ण प्रश्नांवर सकारात्मक विचारविमर्श व विस्तृत चर्चा झाली.

याप्रसंगी अखिल भारतीय काँग्रेस कमिटी, ओबीसी विभागाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मा. श्री. भानुदासजी माळी, खजिनदार श्री. राजाभाऊ हडोळे, सरचिटणीस श्री. तुषार पेंढारकर, सहखजिनदार श्री. सतीश आढाव, श्री. विनोद अहिरकर, डॉ. मेघनाताई वैरागडे व इतर मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments