Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

उमरेड ग्रामीण भागातील अवैध धंदे बंद झाली च पाहिजे



त्रिशा राऊत नागपूर क्राईम रिपोर्टर मो.9096817953

 उमरेड उमरेड शहर व ग्रामीण विभागात बिट जमादार यांच्या कृपेने गुन्हेगारी, खुणखराब, अवैध धंदयात वाढ होवून कायदा व सुव्यवस्था ढासळत असल्याबाबत

माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक साहेब नागपूर परिक्षेत्र नागपूर ग्रामीण यांना चंद्रशेखर बावनकुळे शिवसेना जिल्हाप्रमुख नागपूर ग्रामीण वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्ष नागपूर यांनी दिले निवेदन 

निवेदन सादर करण्यात येते की, उमरेड शहरामध्ये व ग्रामिण भगा त सुद्धा खुण व हॉप मर्डरचे प्रमाण वाढलेले आहे. तसेच तंबाखुचा मोठ्या प्रमाणत अवैध व्यवसाय सुरू असून सट्टापट्टी, गांज्या, नशेली पदार्थाची विकी, सार्वजनिक स्थळावर सेवन करणे खुलेआम सुरू आहे. गिट्टीची अवैध वाहतुक, नो परमिट ट्रव्हल्स, ओव्हरलोट ट्रकमधुन अवैध रेती विकी, जुगार, तसेच ट्राफिक पोलिसांकडून नागरिकांची खुलेआम लुट सुरू आहे. 15 ते 18 वर्षाच्या वयातील मूले व मुली नशेच्या अधिन झाल्याचे दिसून येत आहे. ड्रग्स माफियाचे जाळे पसरलेले दिसून येत आहे.

राजस्व अधिकाऱ्याशी संगणमत करून बांधकामाचे साहित्य गिट्टी, रेती, मुरूम, मोठ्या प्रमाणात कोळसा इत्यादी खनिजाचे अवैधरित्या मोठ्या प्रमाणात वाहतुक व तस्करी सुरू आहे.

त्यामुळे कायदा व सुव्यवस्था तसेच विद्यार्थी, तरूणावर व समाजावर याचा दुष्परिणाम होत असल्याचे आढळुन आले आहे. सबब जनमानसात संबधित प्रशासकीय यंत्रणेच्या निष्क्रियेबद्दल रोष निर्माण झालेला आहे व सतत गुन्हेगारी प्रवृत्तीत वाढ झाल्याने शांतता भंग होण्याची परिस्थिती उद्भवलेली आहे. अशा परिस्थितीत संबधित प्रशासकीय विभाग व अधिकारी यांच्याकडून तात्काळ लक्ष पुरविणे व उपाय करणे आवश्यक झालेले आहे. शहरातील व ग्रामिण भागातील विस्कळीत कायदा व सुव्यवस्था जनहिताला पोषक होईल असे वातावरण निर्माण करणे नितांत जरूरीचे झाले आहे. अशा परिस्थीतीत वरील बाबीकडे आपल्या स्तरावर लक्ष पुरविणे व संबधित विभाग व पोलिस यंत्रणेला आवश्यक निर्देश देणे सुद्धा जरूरीचे झालेले आहे.

सबब विनंती आहे की, वरील वस्तुस्थितीबाबत आपल्या स्तरावरून चौकशी आदेश पारीत करण्याची कृपा करावी. तसेच संबधित निष्क्रिय व भ्रष्टाचारी पोलिस अधिकारी यांच्याविरूद्ध विभागीय चौकशी करून विलबनाची कार्यवाही करावी.

Post a Comment

0 Comments