शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भव्य कार्यकर्ता मेळावा संपन्न.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
गडचिरोली :- गडचिरोली येथे आज दिनांक १६/०८/२०२६रोजी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भव्य कार्यकर्ते
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माननीय पक्षनेते विनायक राऊत साहेब होते. तसेच गडचिरोली जिल्ह्याचे संपर्कप्रमुख मा. महेशजी केदारी साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाचे अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
गडचिरोलीमध्ये प्रथमच एवढ्या मोठ्या स्वरूपात शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्याला सर्व तालुकाप्रमुख, शहरप्रमुख, पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक व कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवसेनेची संघटनात्मक ताकद गडचिरोली जिल्ह्यात तळागाळापर्यंत पोहोचवून पक्षाची संघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. वरिष्ठ नेत्यांनीही गडचिरोली जिल्ह्यात शिवसेनेचे कार्य अधिक जोमाने तळागाळापर्यंत पोहोचेल, असा विश्वास व्यक्त केला.
या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित सतिशभाऊ हरडे, पावन गेडाम जिल्हा प्रमुख गडचिरोली दिलिप सुरपाम अहेरी जिल्हा प्रमुख धिरज सातपुते डॉ बंसोड विलास ठोंबरे शुभम सोरते गुणाजी बोरकुटे गोविंदा बाबनवाडे घनश्याम कोलते बंडु नैताम ज्ञानेश्वर बघमारे संतोष लोनबले विलास ठाकरे गुणाजी पील्लारे देविदास काळबांडे सदाशिव गहाने आषिश काळे मणोज पोर्टे टील्लु मुखर्जी वेणुताई ढवगाये दिगांबर मेश्राम आणि सर्व शहर प्रमुख तसेच,
गडचिरोली येथील शिवसेना स्पेशल टिम
मिनाझ शेख चेतन उरकुडे अतुल नैताम सतिश उरकुडे सोहेल शेख अमन सय्यद आगाझं शेख समिर शेख या सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम पार पडला.
कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा मेळावा भव्य-दिव्य आणि ऐतिहासिक स्वरूपाचा ठरला
आपला
नंदुभाऊ कुमरे
विधानसभा संघटक
गडचिरोली विधानसभा

Post a Comment
0 Comments