एकच आमची ओळख प्रगतीच आमचा ध्यास" कोहळी समाज भव्य मेळावा, सिंदेवाही,
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809
गडचिरोली जिल्ह्यतील कोहळी समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर शासन स्तरावर प्रभावी पाठपुरावा करण्यासाठी कटीबद्ध.
सिंदेवाही येथे कोहळी समाजाच्या आयोजित मेळाव्यात कोहळी समाजाच्या विविध सामाजिक,शैक्षणिक व आर्थिक प्रश्नांची यावेळी माहिती घेतली.
कोहळी समाज संघटनाच्या माध्यमातून शासन स्तरावर पाठपुरावा करून समाज बांधवाना आर्थिक सहाय्य देण्याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेन्यात आले आहे.
कोहळी समाजाच्याच्या प्रलंबित इतर मागण्यांबाबतही शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, यासाठी त्यांच्या प्रश्नांची प्रभावीपणे चर्चा करण्यात आले कोहळी समाज बांधवाना आवश्यक सुविधा आणि संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने संबंधित विषयांवर शासन स्तरावर पाठपुरावा करण्याची भूमिका यावेळी मांडन्यात आले.
मेळाव्यात कोहळी समाज प्रतिनिधींसोबत सविस्तर चर्चा केली. समाजाच्या विविध समस्या व मागण्या जाणून घेत त्यावर आवश्यक कार्यवाहीबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आले.
कोहळी समाजातील सर्व सामान्य नागरिकांच्या व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी त्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देत शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू राहील.असे ठरवण्यात आले.
यावेळी गडचिरोली जिल्ह्यातुन कोहळी समाज अध्यक्ष नाना भाऊ नाकाडे व उपाध्यक्ष डॉ प्रणय भाऊ खुणे व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments