Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

सिंदेवाही पोलिसांचा मोठा धडक अॅक्शन! २५ अल्पवयीन दुचाकीस्वार ताब्यात; पालकांवर दंडात्मक कारवाई



अल्पवयीनांच्या हातात वाहन? सिंदेवाही पोलिसांची विशेष मोहीम; २५ दुचाकी पोलिस ठाण्यात जमा

अल्पवयीनांना वाहन देऊ नका' – सिंदेवाही पोलिसांचा इशारा; नियम मोडणाऱ्या पालकांवर कारवाई

चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली सिंदेवाही पोलिसांनी 

अल्पवयीनवाहनचालकांविरोधात विशेष मोहीम राबवत मोठी कारवाई केली. 

या मोहिमेत २५ अल्पवयीन दुचाकी चालकांना ताब्यात घेऊन त्यांच्या २५ दुचाकी सिंदेवाही पोलीस ठाण्यात जमा करण्यात आल्या.

सिंदेवाही :- शाळांसमोर, बसस्टॉप, बाजार चौक, शिवाजी चौक आदी ठिकाणी स्वतंत्र पथके तैनात करून ही मोहीम राबविण्यात आली. कारवाईनंतर सर्व अल्पवयीन मुलांच्या पालकांना पोलीस ठाण्यात बोलावून वाहतूक नियमांची सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देणे हा कायद्याने गुन्हा असून, यापुढे अशी चूक करू नये, असा स्पष्ट इशारा देण्यात आला.

यावेळी संबंधित पालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यानंतर आवश्यक समज देऊन दुचाकी परत करण्यात आल्या.

पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश मेश्राम, सहाय्यक पोलीस निरीक्षक राणी भोंडवे तसेच सिंदेवाही पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही मोहीम यशस्वीपणे पार पाडली.

सिंदेवाही पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, आपल्या अल्पवयीन मुलांच्या हातात वाहन देऊ नका. वाहतूक नियमांचे पालन करा आणि अपघातमुक्त समाज घडविण्यास सहकार्य करा.

जिल्हा प्रतिनिधी अमान कुरेशी

Post a Comment

0 Comments