Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

गडचिरोलीतील सुपीक शेतजमिनींचे प्रस्तावित अधिग्रहण तातडीने थांबवले जावे: खा. प्रतिभाताई धानोरकर




मनोज एल खोब्रागडे 

✍🏻मुख्य संपादक ✍🏻

8208166961/9860020016


गडचिरोली :- गडचिरोलीतील सुपीक शेतजमिनींचे प्रस्तावित अधिग्रहण तातडीने थांबवले जावे, या न्याय्य मागणीसाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा राज्यसभेचे विरोधी पक्षनेते आदरणीय श्री. मल्लिकार्जुन खरगेजी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर केले.

शेतकऱ्यांच्या या महत्त्वपूर्ण लढ्याला काँग्रेस पक्षाचा पूर्ण पाठिंबा असून, या गंभीर प्रश्नांवर विरोधी पक्षनेते आदरणीय राहुलजी गांधी आणि आदरणीय खरगेजी यांच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर भक्कमपणे आवाज उठवला जाईल, असा विश्वास त्यांनी दिला.

गडचिरोलीतील शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी वाचवण्यासाठी आमचा हा लढा सातत्याने सुरूच राहील!असे व्यक्तव्य यावेळी खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी म्हटले.

Post a Comment

0 Comments