मनोज एल खोब्रागडे
✍🏻मुख्य संपादक ✍🏻
8208166961/9860020016
लातूर, दि. १६ :- पाण्याचे संवर्धन आणि काटकसरीने वापर ही काळाची गरज आहे. माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त यावर्षीपासून २१ ऑगस्ट रोजी जलसंधारण दिन पाळला जात आहे. त्यानिमित्त १५ ते २१ ऑगस्टदरम्यान जलसंधारण सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. २१ ऑगस्ट रोजी ‘महा वॉकेथॉन—वॉक फॉर वॉटर’ ही विशेष मोहीम राबविण्यात येणार असून या उपक्रमाच्या लोगोचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त समारंभात झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उषाताई पाटील, लातूर शहर महानगरपालिकेच्या महापौर जयश्रीताई सोनकांबळे, जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, महानगरपालिका आयुक्त राहुल कुलकर्णी, जिल्हा जलसंधारण अधिकारी जावेद पटेल आदी उपस्थित होते.
जलसंधारण सप्ताह म्हणजे पाण्यासाठी समाजाने एकत्र येण्याचा संकल्प आहे. युवा, विद्यार्थी, महिला बचत गट, शेतकरी आणि सामाजिक संस्थांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. यावेळी उपस्थितांना मृद व जलसंधारणाची शपथ देण्यात आली.

Post a Comment
0 Comments