त्रिशा राऊत नागपूर क्राईम रिपोर्टर मो 9096817953
उमरेड.मा.अनुप खांडे साहेब उपजिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी नागपूरयांना निवेदन चंद्रशेखर बावनकुळे शिवसेना जिल्हाप्रमुख नागपूर ग्रामीण वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्ष नागपूरउमरेड तहसील अंतर्गत कार्यरत मंडळ अधिकारी श्री. हर्षद हेलवटकर यांच्या कार्यपद्धतीबाबत महसूल विभागातील तलाठी तसेच नागरिकांकडून विविध स्वरूपाच्या तक्रारी व आक्षेप उपस्थित करण्यात आले आहेत. संबंधित तक्रारींचे गांभीर्य लक्षात घेता या संपूर्ण प्रकरणाची जिल्हा स्तरावरून निष्पक्ष व सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.
मंडळ अधिकारी श्री. हर्षद हेलवटकर यांच्या कार्यपद्धतीबाबत उमरेड मंडळातील तलाठ्यांनी यापूर्वी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे. या तक्रारीमध्ये कामकाजात अनावश्यक हस्तक्षेप, प्रकरणे प्रलंबित ठेवणे, अर्जदारांना योग्य मार्गदर्शन न करणे तसेच अधिनस्त कर्मचाऱ्यांवर दबाव आणल्याचे आरोप करण्यात आल्याची माहिती आहे.
या तक्रारीच्या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी, उमरेड यांनी दिनांक 9 जुलै 2026 रोजी तहसीलदार, उमरेड यांच्याकडे चौकशीसाठी प्रस्ताव पाठविल्याची माहिती आहे. मात्र, निर्धारित कालावधीत चौकशी अहवाल सादर न झाल्याने दिनांक 20 ऑगस्ट 2026 रोजी तहसीलदारांना स्मरणपत्र देण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने या प्रकरणाची दखल घेऊन एका आठवड्यात गोपनीय चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्याचे समोर आले आहे.
याशिवाय मंडळ अधिकारी श्री. हेलवटकर यांच्या पूर्वीच्या कार्यकाळाशी संबंधित मौजा परसोडी येथील सर्वे क्रमांक 38 मधील जमिनीच्या वर्ग बदलाचे प्रकरण देखील गंभीर स्वरूपाचे आहे. सदर जमीन वर्ग-2 मध्ये असताना सातबारा उतार्यामध्ये कथितरीत्या बदल करून जमीन वर्ग-1 करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणाच्या चौकशीसाठी तत्कालीन अधिकाऱ्यांकडून प्रस्ताव पाठविण्यात आला होता. मात्र, या चौकशीचा अंतिम अहवाल प्राप्त झाला किंवा नाही, याबाबतही स्पष्टता आवश्यक आहे.
नंतर संबंधित जमिनीचा सातबारा उतारा पूर्ववत करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यामुळे सदर प्रकरणात नेमका फेरफार कसा झाला, त्यासाठी कोण जबाबदार होते, संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका काय होती आणि शासनाच्या नोंदीमध्ये बदल करण्याची प्रक्रिया नियमानुसार झाली होती का, याची स्वतंत्र चौकशी होणे आवश्यक आहे. कार्याध्यक्ष-महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा नागपूर (ग्रा.)
त्यामुळे आपणास विनंती आहे की:
1. मंडळ अधिकारी श्री. हर्षद हेलवटकर यांच्या कार्यपद्धतीबाबत तलाठ्यांनी केलेल्या तक्रारीची जिल्हा स्तरावरून निष्पक्ष व स्वतंत्र चौकशी करण्यात यावी.
2. चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित अधिकारी तक्रारीतील प्रकरणांशी संबंधित नोंदी, कागदपत्रे किंवा अधिनस्त कर्मचाऱ्यांवर प्रभाव टाकू नयेत, यासाठी आवश्यक प्रशासकीय उपाययोजना करण्यात याव्यात.
3. मौजा परसोडी, सर्वे क्रमांक 38 जमीन वर्ग बदल प्रकरणाची स्वतंत्रपणे चौकशी करून संबंधित महसूल अभिलेख, जुने व नवीन सातबारा उतारे, फेरफार नोंदी, आदेश व संबंधित कागदपत्रांची तपासणी करण्यात यावी.
4. सदर जमीन प्रकरणातील चौकशी पूर्वी प्रलंबित का राहिली, याचीही जबाबदारी निश्चित करण्यात यावी.
5. तलाठ्यांनी केलेल्या तक्रारीतील आरोप चौकशीत सत्य आढळल्यास संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध नियमानुसार कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी.
6. चौकशीदरम्यान तक्रारदार तलाठी, कर्मचारी तसेच संबंधित नागरिकांवर कोणत्याही प्रकारचा दबाव किंवा प्रतिशोधाची कारवाई होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी.
7. संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आवश्यक असल्यास जिल्हा स्तरावरील वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांची स्वतंत्र चौकशी समिती नियुक्त करण्यात यावी.
8. या प्रकरणात आतापर्यंत झालेल्या चौकशीची सद्यस्थिती व पुढील करण्यात येणाऱ्या कारवाईबाबत तक्रारदारास लेखी माहिती देण्यात यावी.
सदर प्रकरण हे महसूल विभागाच्या पारदर्शक व निष्पक्ष कामकाजाशी संबंधित असल्याने याची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने चौकशी करण्यात यावी, ही विनंती.
संलग्न कागदपत्रे :
1. तलाठ्यांनी केलेल्या तक्रारीची प्रत. 2. दिनांक 9 जुलै 2026 रोजीचा चौकशी प्रस्ताव / पत्राची प्रत. 3 दिनांक 20 ऑगस्ट 2026 रोजीच्या स्मरणपत्राची प्रत. 4. परसोडी सर्वे क्रमांक 38 संबंधित उपलब्ध महसूल कागदपत्रे. 5. सातबारा उतारे व फेरफार नोंदींच्या प्रती . इतर संबंधित कागदपत्रे व पुरावे. प्रतिलिपी :
1. मा. देवेन्द्र फडणवीस मुख्यमंत्री (सचिवालय नागपूर) महाराष्ट्र राज्य
2. मा. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री मुबंई महाराष्ट्र राज्य.
3. मा. चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री तथा पालकमंत्री नागपूर जिल्हा
4. मा. आशिष जयस्वाल, राज्यमंत्री मुबंई महाराष्ट्र राज्य
5. मा. आयुक्त साहेब, (महसूल विभांग) नागपूर जिल्हा

Post a Comment
0 Comments