राजेंद्र झाडे
चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
निवड :- हिवऱ्याच्या शैक्षणिक परंपरेला नवा मान!
मौजा हिवरा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतून शिक्षण घेतलेल्या धीरज पुलगमकर, सुप्रिया पुलगमकर आणि स्नेहल हिवरकर या तीन विद्यार्थ्यांची शिक्षक भरती प्रक्रियेत निवड झाल्याने संपूर्ण हिवरा गावात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. गावातूनच शिक्षण घेत पुढे गोंडपिपरी येथील दलित मित्र डी एड कॉलेज येथे शिक्षण पूर्ण करून, स्पर्धा परीक्षेत उत्तम कामगिरी करत या विद्यार्थ्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे.
ही केवळ तीन विद्यार्थ्यांची नियुक्ती नाही, तर हिवरा जिल्हा परिषद शाळेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची आणि शिक्षकांच्या मेहनतीची पावती आहे. या शाळेतून शिक्षण घेणारा हुशार विद्यार्थी पुढे कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करतो, ही हिवरा जिल्हा परिषद शाळेची विशेष ओळख बनली आहे. त्यामुळेच आजूबाजूच्या गावांमधील विद्यार्थीही चांगले शिक्षण मिळावे म्हणून या शाळेकडे आकर्षित होतात.
धीरज, सुप्रिया आणि स्नेहल यांचे यश हे गावातील प्रत्येक विद्यार्थ्यासाठी प्रेरणादायी आहे. परिस्थिती कोणतीही असो, मेहनत, जिद्द आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर यश नक्की मिळवता येते, हे या तिघांनी सिद्ध करून दाखवले आहे. त्यांच्या या यशामुळे हिवरा गावाचा शैक्षणिक मान आणखी उंचावला आहे.
नवनियुक्त शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील सेवेसाठी हार्दिक शुभेच्छा!
आजचे हे यश उद्याच्या अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणेचा दीप ठरो आणि हिवऱ्यातून भविष्यातही अनेक अधिकारी, शिक्षक व गुणवंत घडत राहोत, हीच सदिच्छा!
जय हिवरा!
शिक्षणाची परंपरा अशीच उज्ज्वल राहो!

Post a Comment
0 Comments