मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
पेरमिली : लोकशाही पत्रकार संघटना, पेरमिलीच्या वतीने येथील अस्थिव्यंग व मूकबधिर निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, नोटबुक, पेन तसेच इतर आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकशाही पत्रकार संघटनेचे वरिष्ठ पत्रकार डॉ. शंकर दुर्गे होते. प्रमुख पाहुणे म्हणून आसिफ खान पठाण, श्रीकांत दुर्गे, श्रीनिवास बंडमवार, आरोग्य कर्मचारी वैरागडे तसेच पत्रकार व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक डॉ. कमलेश झाडे, अधीक्षक कलंदर शेख, अधीक्षक कु. निता झाडे तसेच विशेष शिक्षक सुशील सेमस्कर प्रवीण बनकर, रमेश भोयर, प्रफुल पाटील, श्रीकांत पुप्पाला, कालिदास खोब्रागडे, स्वप्नील दहागावकर, प्रशांत पिंपळकर, कु. शालू चौधरी यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
पालकांचीही उत्स्फूर्त उपस्थिती.
विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप होत असताना पालक वर्गानेही कार्यक्रमाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला. यावेळी संदीप तलांडे, शामराव कागदेलवार, बाजीराव सडमेक, परेश इस्टम आणि बाबुराव इस्टम यांच्यासह पालक वर्ग उपस्थित होता.
विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, नोटबुक, पेन आदी शैक्षणिक साहित्य मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साधने उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे उपस्थितांनी सांगितले.
दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला, आत्मविश्वासाला आणि सर्वांगीण विकासाला समाजातील विविध घटकांनी सहकार्य करणे आवश्यक आहे. अशा सामाजिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळते आणि त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला सकारात्मक बळ मिळते, असे यावेळी उपस्थितांनी नमूद केले.

Post a Comment
0 Comments