भव्य मोटरसायकल रॅली व संविधानाचा जागर सामाजिक प्रबोधन गुणवंत विद्यार्थी सत्कार व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरा.
गौतम कांबळे
यवतमाळ शहर प्रतिनिधी
मो. 8390700293
यवतमाळ :- यवतमाळ गौतम कांबळे नऊ ऑगस्ट. जागतिक आदिवासी दिनानिमित्त यवतमाळ येथे सामाजिक प्रबोधन गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कॉटन मार्केट कृषी उत्पन्न बाजार समिती यवतमाळ येथे हा उत्सव पार पाडला.
जागतिक आदिवासी दिनानिमित्त नऊ ऑगस्ट रविवारी भव्य मोटरसायकल रेल्वे काढण्यात आली वाघापूर येथून सुरू झालेली रॅली लोहारा दरडा नाका वडगाव नाका दाते कॉलेज चौक नेताजी चौक संविधान चौक एलआयसी चौक महात्मा फुले पुतळा टांगा चौक मेन लाईन लोखंडी पूल तलाव होईल मार्ग क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांच्या ताईला चित्रा जवळ पोहोचली.
तेथे रॅलीचा समोरप करण्यात आला समरोपानंतर उपस्थित यासाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली यानंतर कॉटन मार्केट येथील सामाजिक प्रबोधन कार्यक्रमात अखिल भारतीय संविधान हक्क परिषदेचे माननीय गीत घोष सर यांनी आदिवासी समाजाला वनवासी करण्याचे षडयंत्र या विषयावर दमदार मार्गदर्शन केले त्यानंतर वर्धा येथील जिल्हाध्यक्ष श्याम दादा ब्रिगेड किसन वाघमारे सर यांनी आदिवासी समाजाची दिशा व दशा या विषयावर इतिहासाच्या विविध पैलूवर प्रकाश टाकणारे मार्गदर्शन केले कार्यक्रमादरम्यान गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आदिवासी समाजाचा इतिहास संस्कृती हक्क आणि संविधानिक अधिकाराबद्दल जनजागृती करण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता जागतिक आदिवासी दिन उत्सव कृती समिती यवतमाळ अध्यक्ष श्रीकृष्ण भिवणकर कार्याध्यक्ष दिलीप शेळके उपाध्यक्ष शैलेश गाडेकर सचिव जीवन कोवे देवेंद्र चांदेकर मळावी यांच्यासह समितीतील पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी परिश्रम घेतले जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला समाज बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला

Post a Comment
0 Comments