Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

महाराष्ट्राचा आवाज पोहोचला लंडनच्या जागतिक मंचावर!




मनोज एल खोब्रागडे 

✍🏻मुख्य संपादक✍🏻

8208166961/9860020016 

 नाशिक : -महाराष्ट्राच्या कर्तृत्वाची जागतिक पातळीवर नवी ओळख निर्माण करणारी एक विशेष भेट नुकतीच पार पडली. सामाजिक व क्रीडा क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेले डॉ. निलेश (दादा) राणे यांनी ‘World Book of Records, London’ कार्यालयाला विशेष भेट दिली.

यावेळी डॉ.राणे यांचे कार्यालयातील पदाधिकारी व कर्मचाऱ्यांकडून स्वागत करण्यात आले. भेटीदरम्यान त्यांनी संस्थेच्या कार्यपद्धतीबाबत तसेच जागतिक स्तरावर नोंदवल्या जाणाऱ्या विविध विक्रमांविषयी माहिती जाणून घेतली.

या विशेष भेटीदरम्यानचे अनेक संस्मरणीय क्षण छायाचित्रांमध्ये टिपण्यात आले. अभिमान, सन्मान आणि जागतिक ओळखीचा संगम असलेली ही भेट डॉ.राणे यांच्या वाटचालीतील एक विशेष क्षण ठरली.

महाराष्ट्राच्या मातीतून सुरू झालेला प्रवास आता जागतिक व्यासपीठापर्यंत पोहोचत असून, विविध क्षेत्रांतील कार्यातून डॉ.राणे आपली वेगळी ओळख निर्माण करत आहेत. लंडनमधील ही भेट महाराष्ट्राच्या कर्तृत्वाला जागतिक मंचाशी जोडणारा प्रेरणादायी क्षण ठरली.

“महाराष्ट्रातून जागतिक मंचावर…” कर्तृत्व, सन्मान आणि अभिमानाचा अविस्मरणीय क्षण!

Post a Comment

0 Comments