मनोज एल खोब्रागडे
✍🏻मुख्य संपादक✍🏻
8208166961/9860020016
भद्रावती :- पाटाळा येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या नवीन इमारतीचे लोकार्पण जिल्ह्याचे पालकमंत्री मा. प्रा. डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते अत्यंत उत्साहात पार पडले.
ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार व तत्पर आरोग्य सुविधा मिळण्याच्या दृष्टीने उभारण्यात आलेल्या या सुसज्ज इमारतीमुळे परिसरातील आरोग्य व्यवस्थेला बळकटी मिळणार आहे.
याप्रसंगी आमदार मा. श्री. करण देवतळे, जिल्हाधिकारी मा. वसुमना पंत, मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. पुलकित सिंग, उपविभागीय अधिकारी मा. श्री. संदीप भस्के, पाटाळा गावचे सरपंच श्री. विजेंद्र वानखेडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बंडू रामटेके, कार्यकारी अभियंता श्री. दिनदयाल मटाले आणि गट विकास अधिकारी श्री. आशुतोष सपकाळ यांच्यासह इतर शासकीय अधिकारी, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments