Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

राजाराम परिसरात विविध ठिकाणी ध्वजारोहण कार्यक्रम ताठामाठात संपन्न.




पोलीस प्रभारी अधिकारी नारायण श्रीरामे यांचे हस्ते ध्वजारोहन कार्यक्रम संपन्न.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.

राजाराम :- १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. पण हा स्वातंत्र्याचा दिवस आपल्याला केवळ ब्रिटिश राजवटीच्या समाप्तीची आठवण करून देत नाही; तर तो आपल्याला त्या असंख्य ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाची आठवण करून देतो, ज्यांनी देशासाठी आपले सर्वस्व अर्पण केले.

महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिक्षण आणि सामाजिक समतेचा लढा उभारला.

सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी समाजाचा विरोध सहन केले तर 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्याला सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाची दिशा दिली आणि संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला समान अधिकार दिले, या वेळी  पोलीस प्रभारी अधिकारी नारायण श्रीरामे यांनी आपले मनोगतात म्हटले आहे.या वेळी पोलीस उपनिरीक्षक राकेश बुराम, तसेच पोलीस उपनिरीक्षक प्रतिक धडनकर, उपनिरीक्षक मिर्जा, पोलीस हवालदार कुंदाम आणि अंमलदार पोलीस कर्मचारी मोठया प्रमाणात उपस्थित होते तर,


भगवंतराव आश्राम शाळेचे शाळा व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष व्येकटेश अर्का यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले या वेळी शाळेचे मुख्याध्यापक टी, सी ओडनालवार आपले भाषणात म्हटले आहे, की,

 तिरंगा हातात घेणे सोपे आहे; पण संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय आपल्या आचरणात आणणे ही खरी देशभक्ती आहे.असे भगवंतराव प्राथमिक तथा माध्यमिक आश्राम शाळेचे मुख्याध्यापक टी. सी. ओडनालवार यांनी भाषणात व्यक्त केले.या वेळी, शाळेचे शिक्षकवर्ग पी,आर, गोंडाने,एस, पी वासाडे, एस, एस, मेश्राम, जी, एस कापटे, एस, आर, पठाण, व्ही, बी, बत्तूलवार, एस, सी, ओडनालवार, एन, एम, मडावी, पी , बी, गेडाम,एस, डब्लू, पठाण, ए, वाय, आत्राम, एस, जी, दाढे, बी, डी, पेद्दापल्ली, व्ही, बी, बोम्मावार, व्ही, बी, सडमेक, एस, डी, भोयर, एस, पी, जाकेवार, आर, के, राचरलावार, एस, व्ही, बंडी, पी, डी, अलगमकर,आदी शिक्षकरुंद व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते तर,


जिल्हा परिषद केंद्र शाळेत शाळा व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष वसंतराव सडमेक यांच्या हस्ते ध्वजारोहन कार्यक्रम संपन्न. या वेळी केंद्रप्रमुख प्रवीण पुल्लूरवार उपस्थित होते तर, मुख्याध्यापक अजय पस्पूनुरवार, माध्यमिक शिक्षक, सुरेशचंद्र जुमनाके,शिक्षक बी, वाय सोयाम, अजय कडते, श्रीनिवास नैताम, रवि आऊतकर, मनोज अर्का, सुनिता बामनकर, उपस्थित तर गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठया प्रमाणात उपस्थित होते,


ग्रामपंचायत राजाराम येथील प्रथम नागरिक सरपंचा मंगलाताई आत्राम यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न या वेळी उपस्थित ग्रामपंचायत चे ग्रामसेवक अमर करशी उपस्थित होते तर ग्रामपंचायत पदाधिकारी उपसरपंच  रोशन कंबगोणीवार, माजी सभापती  भास्कर तलांडे, ग्रामपंचायत सदस्य . रमेश पोरतेट,  सुखदेव आलाम,विनायक आलाम, पेसा अध्यक्ष  विनोद सिडाम, संजावली अरगेलवार,. पूजा सडमेक, यशोदा आत्राम सुशीला सोयाम, माजी सरपंचा  ज्योतीताई जुमानके. माजी सरपंच  नागेश कन्नाके, माजी उपसरपंच  संजय पोरतेट, माजी उपसरपंच वसंत सिडाम,दिपक अर्का, प्रतिष्ठीत नागरिक . नारायण कबगोणीवार, सत्यया गड्डमवार, बाबुरावजी कंबगोणीवार, व्येकटेश पंजलवार, मधुकर मोत्तकुरवार, रवींद्र पंजालवार, मनोज सिडाम, जितेंद्र गड्डामवार, जितेंद्र पंजालवार, तिरुपती दुर्गे, राम जुमडे, मनोज आकदर, प्रमोद दुर्गे, राजू दुर्गे, गोपाल चंदनखेडे,ग्रामपंचायत कर्मचारी सदाशिव गोंगले,नितीन मोत्तकुरवार सुधाकर सडमेक, रोहित अर्का. शाळेचे कर्मचारी, विद्यार्थी, आरोग्य कर्मचारी,अंगणवाडी सेविका, मदतनिस, पोस्ट ऑफिस कर्मचारी,आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments