Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

वांगेतुरी व नेलगुंडा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचांचा CPI मध्ये प्रवेश




मनोज एल खोब्रागडे 

✍🏻मुख्य संपादक ✍🏻

8208166961/9860020016

एटापल्ली/भामरागड :- भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (CPI) विचारधारेवर विश्वास व्यक्त करत वांगेतुरी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच शैला रामसु कोवासी तसेच भामरागड तालुक्यातील नेलगुंडा ग्रामपंचायतीचे उपसरपंच सरजू रामा मज्जी यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केला.

CPIचे जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार यांच्या हस्ते हा पक्षप्रवेश करण्यात आला. यावेळी कॉ. सुरज जक्कुलवार, जिल्हा सदस्य CPI यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

ग्रामीण व आदिवासी भागातील जनतेच्या मूलभूत प्रश्नांसाठी, शेतकरी, कामगार, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कांसाठी CPIच्या माध्यमातून संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

वांगेतुरी व नेलगुंडा परिसरातील स्थानिक प्रश्न, विकासकामे, मूलभूत सुविधा आणि जनतेच्या हक्कांसाठी पक्षाच्या माध्यमातून सातत्याने आवाज उठविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या पक्षप्रवेशामुळे एटापल्ली आणि भामरागड तालुक्यात भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या संघटनात्मक विस्ताराला बळ मिळाले असून आगामी काळात ग्रामीण भागात पक्षाची संघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments