शेकडो शेतकऱ्यांचे भविष्य अंधारात.
सरकारने या भागातील सात गावातील शेतकऱ्यांना,शेतीचे तात्काळ पट्टे द्यावे.
राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेची मागणी.
प्रणय भाऊ खुणे प्रदेश अध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार संघटना.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नंबर 9420751809.
दिनांक 28 सप्टेंबर 2026 घोट :-
रेगडी हळदवाही जिल्हा परिषद क्षेत्रातील मंजेगाव,किसाननगर, मछली, चक चापलवाडा, हळदवाही,हळदवाहीटोला,
पेटतळा, भाडभीडी, येथील स्थानिक शेकडो शेतकऱ्यांचे या ठिकाणातील शेतीवर 1958 पासून वहिवाट आहे. व इतक्या वर्षापासूनचे अतिक्रमण पंजी व इतर महत्त्वाचे दस्तावेज उपलब्ध असून सुद्धा येथील शेतकऱ्यांचे कोणतेच रेकॉर्ड आजपर्यंत भूमी अभिलेख कार्यालयात बनले नाही व त्यामुळे येथील शेती शिवारा बाबत भूमी अभिलेख कडे कोणत्याही प्रकारचे गट नंबर उपलब्ध नाही. सदर शेतकरी यांच्याकडे इतर कागदपत्राची शहानिशा केल्यानंतर असे कळाले की गेल्या इतक्या वर्षापासून स्थानिक शेतकरी शेतीच्या पट्ट्या पासून वंचित आहेत, सातबारा न बनल्यामुळे केंद्र व राज्य शासनाच्या शेतकऱ्यांच्या विविध योजनांपासून सदर शेतकरी, गेल्या अनेक वर्षांपासून वंचित आहेत, व या स्थानिक सर्व गावातील शेतकऱ्यांची महत्त्वाची बैठक मंजेगाव येथे संपन्न झाली
या बैठकीत राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रणय भाऊ खुणे यांनी सर्व उपस्थित शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले व यावेळी सांगितले या भागातील समस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी स्थानिक आमदार मिलिंद भाऊ नरोटे माजी खासदार अशोक भाऊ नेते व मुख्यमंत्री महोदय यांचे ओ,एस, डी, पालकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत, तहसीलदार व भूमी अभिलेख अधिकारी यांची लवकरच बैठक लावून स्थानिक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार तसेच याबाबत राज्याचे महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळेजी यांच्या सोबत चर्चा करणार असे आश्वासन दिले,यावेळी राष्ट्रीय मानवाधिकार संघटन जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, उपाध्यक्ष किशोर कुंडू, माजी सरपंच रमेश लेकलवार, गणपती तुंकलवार,अंकित मोहुर्ले,
विनायक गर्तूलवार,गजानन गर्तूलवार, मोहन बंडावार, योगेंद्र चौधरी व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments