Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

गोंडपीपरी तालुक्यातील डोंगरगावला बससेवेची प्रतीक्षा विद्यार्थ्यांचा जंगलवाटेने जीवघेणा प्रवास

 



बस सुरू करण्याच्या मागणीसाठी शेकडो विद्यार्थी व ग्रामस्थ आगारात दाखल

राजेंद्र झाडे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण
प्रतिनिधी मो 9518368177

गोंडपिपरी : - गोंडपिपरी तालुक्यातील जंगल परिसराला लागून असलेल्या डोंगरगावात स्वातंत्र्यकाळापासून आजतागायत बससेवा पोहोचलेली नाही.त्यामुळे गावातील विद्यार्थी, महिला,ज्येष्ठ नागरिक तसेच ग्रामस्थांना दळणवळणासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.विशेषतः उच्च शिक्षणासाठी धाबा व गोंडपिपरी येथे जाणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय दिवसेंदिवस वाढत आहे.
डोंगरगावातील सुमारे ४० ते ५० विद्यार्थी शिक्षणासाठी दररोज धाबा व गोंडपिपरी येथे ये-जा करतात.धाबा गाठण्यासाठी विद्यार्थ्यांना जंगल परिसरातून तब्बल चार किलोमीटर पायदळ प्रवास करावा लागतो.या परिसरात वन्यप्राण्यांचा व विशेषतः वाघाच्या वावरामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.सकाळी लवकर शाळा-महाविद्यालयासाठी निघणाऱ्या तसेच सायंकाळी परतणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
या पार्श्वभूमीवर सोमवार, दि. २८ सप्टेंबर सोमवारी रोजी डोंगरगावातील शेकडो विद्यार्थी व ग्रामस्थ गोंडपिपरी आगारात एकत्र आले.गावात नियमित बससेवा सुरू करण्याची मागणी करत त्यांनी आगार प्रशासनाला निवेदन दिले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याबरोबरच त्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून डोंगरगावपर्यंत एसटी बससेवा तातडीने सुरू करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
“जंगलवाटेचा प्रवास थांबवा, डोंगरगावला बस द्या” अशी मागणी ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी केली आहे. बससेवा सुरू झाल्यास विद्यार्थ्यांसह संपूर्ण गावाच्या दळणवळणाचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार आहे.

Post a Comment

0 Comments