मनोज एल खोब्रागडे
✍🏻मुख्य संपादक✍🏻
८२०८१६६९६१/९८६००२००१६
एटापल्ली :- ग्रामपंचायत गर्देवाडा अंतर्गत रेखाभटाळ गावातील Airtel मोबाईल टॉवर गेल्या अनेक दिवसांपासून बंद असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. टॉवरसाठी डिझेलचा नियमित पुरवठा होत नसल्याने नेटवर्क सेवा वारंवार खंडित होत असल्याचा आरोप CPIने केला आहे.
नेटवर्कअभावी विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण, UPI व बँकिंग व्यवहार, ऑनलाइन शासकीय कामे तसेच नातेवाईक, अधिकारी आणि आपत्कालीन सेवांशी संपर्क करण्यात अडचणी येत आहेत.
“दुर्गम भागातील नागरिकांसाठी मोबाईल नेटवर्क ही अत्यावश्यक सेवा आहे. डिझेलअभावी वारंवार टॉवर बंद पडणे गंभीर बाब आहे. संबंधितांनी तातडीने डिझेलचा नियमित पुरवठा करून नेटवर्क सेवा सुरळीत करावी. तसेच कायमस्वरूपी वीज कनेक्शन किंवा सौरऊर्जा व्यवस्था उपलब्ध करून समस्या कायमची सोडवावी,” अशी मागणी CPIचे जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार यांनी केली.
या प्रकरणी तहसीलदार, एटापल्ली यांना निवेदन देऊन डिझेल पुरवठ्यातील हलगर्जीपणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. समस्या तातडीने सोडवून कार्यवाहीचा लेखी अहवाल देण्याची मागणी कॉ. सचिन मोतकुरवार, कॉ. सुरज जककुलवार आणि रेखाभटाळ गावकऱ्यांनी केली आहे.

Post a Comment
0 Comments