Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

मा. प्रविणजी लता बालमुकुंद शर्मा यांच्या वाढदिवसानिमित्त अहेरीत रुग्णांना फळे व बिस्किटांचे वाटप.





मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.



अहेरी, दि. ५ सप्टेंबर २०२६ : शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष (डॉ. श्रीकांतजी शिंदे फाऊंडेशन)चे विदर्भ प्रमुख मा. प्रविणजी लता बालमुकुंद शर्मा साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अहेरी येथे सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.


जिल्हा वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख बिर्जू भाऊ गेडाम, महिला तालुका प्रमुख सौ. मंगला गेडाम, शहर प्रमुख विनेश तोटावार  , शहर संघटक आयुष मामीडवार , सोशल मीडिया प्रमुख अंकुश मंडालवार, प्रमोद ढेरे, अंगूवार यांच्या पुढाकाराने उपजिल्हा रुग्णालय अहेरी तसेच महिला व बाल रुग्णालय, अहेरी येथे रुग्णांना फळे व बिस्किटांचे वाटप करण्यात आले.


यावेळी रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची आस्थेने विचारपूस करून त्यांना फळे व बिस्किटे वाटप करण्यात आली. सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम राबवून मा. प्रविणजी लता बालमुकुंद शर्मा साहेब यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.


या कार्यक्रमाला शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. श्रीकांतजी शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रात जनसेवेचे कार्य सातत्याने सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

Post a Comment

0 Comments