मनोज एल खोब्रागडे
✍🏻मुख्य संपादक ✍🏻
८२०८१६६९६१/९८६००२००१६
नागपूर :- सविस्तर माहिती याप्रमाणे आहे की नागपूर येथील उप्पलवाडी औद्योगिक वसाहतीतील रस्ते, ड्रेनेज, पाणीपुरवठा आणि सुरक्षेच्या समस्यांमुळे उद्योजकांसोबतच कामगार आणि परिसरातील नागरिकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या प्रश्नांवर केवळ चर्चा नाही, तर *ठोस उपाययोजना व्हाव्यात* यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यासमवेत आमदार डॉ. नितीन राऊत यांनी संयुक्त पाहणी दौरा केला.
समस्यांची प्रत्यक्ष पाहणी करून तात्काळ सर्वेक्षण व अहवाल सादर करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.
चांगले रस्ते, सुरळीत ड्रेनेज, नियमित पाणीपुरवठा आणि सुरक्षित वातावरण — यामुळे उद्योजकांना सुविधा, कामगारांना सुरक्षितता आणि नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
जनतेच्या प्रश्नांवर पाठपुरावा करून परिणाम दिसेपर्यंत काम सुरूच राहील! असे व्यक्तव्य आमदार नितीन राऊत यांनी वेळी केले.
Post a Comment
0 Comments