मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
गडचिरोली, दि. २ सप्टेंबर २०२६ : रमाई घरकुल योजनेतील पात्र लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळावा तसेच योजनेतील उर्वरित लाभार्थ्यांची प्रलंबित बिले तात्काळ टाकण्यात यावीत, या मागणीसाठी मा. नगराध्यक्ष रोजाताई करपे तसेच बांधकाम सभापती महेश बाकेवार यांनी समाज कल्याण विभाग, गडचिरोली येथे मा. सचिन मडावी, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे मागणी केली.
रमाई घरकुल योजनेतील अनेक पात्र लाभार्थ्यांची बिले अद्याप प्रलंबित असून, त्यामुळे घरकुलाचे काम पूर्ण करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. उर्वरित सर्व पात्र लाभार्थ्यांची बिले तात्काळ टाकण्यात यावीत, तसेच जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांना रमाई घरकुल योजनेचा लाभ मिळावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावर सहाय्यक आयुक्त सचिन मडावी यांनी लवकरच रमाई घरकुल योजनेतील उर्वरित बिले टाकण्यात येतील तसेच नवीन पात्र लाभार्थ्यांनाही योजनेचा लाभ देण्यात येईल, असे आश्वासन दिले.
यावेळी रमाई घरकुल योजनेचा जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळावा आणि उर्वरित लाभार्थ्यांची बिले तातडीने मंजूर करून टाकण्यात यावीत, अशी आग्रही मागणी करण्यात आली.

Post a Comment
0 Comments