Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

सेलू येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाची नूतन इमारत व शासकीय निवासस्थान इमारतीचे लोकार्पण संपन्न



सेलू शहराच्या सर्वांगीण, आधुनिक विकासाला प्राधान्य: पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

मनोज एल खोब्रागडे 

✍🏻मुख्य संपादक ✍🏻

८२०८१६६९६१/९८६००२००१६


परभणी : - सेलू शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. शहर स्वच्छ, सुंदर, आधुनिक आणि नागरिकांसाठी अधिक सुविधायुक्त बनविण्यावर विशेष भर दिला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिली. 


सेलू येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाची नूतन इमारत व शासकीय निवासस्थान इमारतीचा लोकार्पण सोहळा आज पालकमंत्री यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. याप्रसंगी नगराध्यक्ष मिलिंद सावंत, उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी, तहसीलदार डॉ. शिवाजी मगर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय जाधव यांच्यासह  पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.


पालकमंत्री श्रीमती बोर्डीकर म्हणाल्या की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश वेगाने विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे. प्रत्येक क्षेत्रात जागतिक दर्जाच्या सुविधा निर्माण केल्या जात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातही विकासाला नवी गती मिळाली असून दळणवळण, आरोग्य, शिक्षण आणि सार्वजनिक सुविधांची कामे उच्च दर्जाची झाली पाहिजेत, असा त्यांचा मानस आहे. याच विकासाच्या धर्तीवर सेलू शहराचाही सर्वांगीण आणि आधुनिक विकास करण्यासाठी प्रयत्न केले जातील. 


येत्या काळात सेलू शहरात अनेक विकासाची कामे केली जाणार आहेत. अंडरग्राउंड ड्रेनेज,  गॅस पाईपलाईन यांसारखी महत्त्वाची विकासकामे करण्याचा मानस आहे.  शासकीय कार्यालयांच्या सर्व इमारतीही आधुनिक आणि सुविधायुक्त करण्यात येतील. प्रत्येक कार्यालयाला आयएसओ मानांकन मिळावे, या दृष्टीने काम केले जाईल. स्वच्छता आणि विकासाच्या माध्यमातून सेलू शहराला मराठवाड्यातील एक सुंदर शहर बनविण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करूया.  नागरिकांनी स्वच्छतेला प्राधान्य देऊन आपले शहर कायम स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही पालकमंत्री यांनी केले.

Post a Comment

0 Comments