Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत विश्वशांती विद्यालयाला मान्यवरांची भेट




प्रमोद एन.चिंतलवार 

तालुका प्रतिनिधी गडचिरोली 

मो. नं. 9405133420


चामोर्शी (कुनघाडा रै.): ‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत  विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय, कुनघाडा रै. येथे शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची शाळा भेट संपन्न झाली. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांशी संवाद साधून शैक्षणिक गुणवत्ता, शालेय सुविधा आणि विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांचा आढावा घेण्यात आला.


या शाळा भेटीस मा. डॉ. सावरकर मॅडम, शिक्षण उपसंचालक, नागपूर, मा. धनंजय चापले प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट), मा. हेमलदा परसा  गटशिक्षणाधिकारी, गडचिरोली/धानोरा तसेच मा. अमरसिंग गेडाम उपशिक्षणाधिकारी, गडचिरोली यांची प्रमुख उपस्थिती होती.


शाळा भेटीदरम्यान मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या शैक्षणिक प्रगतीची माहिती घेतली. तसेच विविध वर्गांना भेट देऊन प्रत्यक्ष अध्यापन केले आणि विद्यार्थ्यांच्या अध्ययन-अध्यापन प्रक्रियेचा अनुभव घेतला. नियोजित वर्ग अध्यापन, विद्यार्थीकेंद्रित शिक्षणपद्धती तसेच शैक्षणिक गुणवत्तेबाबत त्यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले.


यावेळी शाळेतील भौतिक सुविधांची पाहणी, अत्याधुनिक प्रयोगशाळा, शालेय पोषण आहार, शालेय परिसर आणि परसबागेची पाहणी करण्यात आली. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.


शाळेतील शैक्षणिक उपक्रम, उत्तम शालेय परिपाठ, नियोजित वर्ग अध्यापन, विद्यार्थ्यांचा सहभाग आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांबद्दल मान्यवरांनी समाधान व्यक्त केले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करावेत, तसेच अध्यापन अधिक प्रभावी व विद्यार्थीकेंद्रित करण्याबाबत त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.


मान्यवरांच्या या शाळा भेटीमुळे विद्यार्थी व शिक्षकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या दिशेने कार्य करण्यासाठी नवी प्रेरणा मिळाली आहे.


सुंदर शाळा... आनंदी विद्यार्थी... गुणवत्तापूर्ण शिक्षण! हा संदेश देत ‘चला शाळेत जाऊया’ अभियानाला अधिक बळ मिळाले.

Post a Comment

0 Comments