Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

मानव विकास मिशन’ अंतर्गत विशेष स्कूल बस पण प्रवास मात्र इतर प्रवाशांचा.



 शाळकरी विद्यार्थिनींवर पायपीट आणि उभं राहण्याची वेळ.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.


अहेरी :- अहेरी-रेपनपल्ली-छल्लेवाडा मार्गावरील संतापजनक वास्तव.

नागरिकांसाठी स्वतंत्र बस सुरू करण्याची पालकांची मागणी.

ग्रामीण भागातील मुला-मुलींना शिक्षणासाठी सोयीचे व्हावे आणि त्यांची पायपीट थांबावी म्हणून शासनाने ‘मानव विकास मिशन’ अंतर्गत विशेष स्कूल बस सुरू केल्या. मात्र, अहेरी - रेपनपल्ली - छल्लेवाडा या मार्गावर धावणाऱ्या मानव विकास बसमध्ये विद्यार्थ्यांचेच हाल होत असल्याचे संतापजनक चित्र समोर आले आहे. नाव फक्त ‘स्कूल बस’चे, पण प्रत्यक्ष कारभार मात्र सामान्य प्रवाशांच्या गर्दीत अडकलेला, असा विदारक प्रकार या मार्गावर दररोज पाहायला मिळत आहे.

विद्यार्थ्यांच्या प्रवासासाठी राखीव असणाऱ्या या फेरीमध्ये इतर प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळत आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांसाठी ही विशेष फेरी सुरू केली आहे, त्यांनाच बसमध्ये बसायला जागा मिळत नाही. विशेषतः शाळकरी विद्यार्थिनींना अंगावर दप्तर सांभाळत संपूर्ण प्रवासात उभे राहावे लागत आहे, तर काही वेळा जागाच शिल्लक नसल्याने विद्यार्थ्यांना बस सोडून द्यावी लागत असल्याचे चित्र आहे.शिक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थिनींचा हा त्रास थांबवण्यासाठी एसटी महामंडळाने तात्काळ या प्रकरणात लक्ष घालावे. मानव विकासच्या बसमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांनाच बसण्यास पूर्ण प्राधान्य द्यावे आणि इतर प्रवाशांच्या सोयीसाठी तात्काळ दुसरी पर्यायी बस सुरू करावी, अशी जोरदार मागणी आता अहेरी, रेपनपल्ली व छल्लेवाडा परिसरातील पालक आणि विद्यार्थ्यांमधून केली जात आहे.

Post a Comment

0 Comments