Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

आत्मसमर्पण केलेल्या जहाल नक्षलवादी भूपतीच्या नियुक्ती संदर्भात कुलगुरूंचे स्पष्टीकरण:



 शेतकरी व जेष्ठ समाजसेवक पुरस्कृत सिताराम मडावी यांनी पत्रकातून केली.

मधुकर गोंगले,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.

गडचिरोली :- गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे हे उच्चशिक्षित, विद्याविभूषित आणि कायद्याचे पंडित मानले जातात. मात्र, कुख्यात आणि जहाल नक्षलवादी, अनेक बॉम्बस्फोटांचा मास्टरमाईंड मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ भूपती याच्या विद्यापीठातील नियुक्तीबाबत ते जनतेसमोर किती धादांत खोटे बोलत आहेत, हे पाहून आश्चर्य वाटते. स्वतःची आणि विद्यापीठाची बाजू सावरण्यासाठी कायद्याचा आधार घेत अत्यंत सराईतपणे जी सारवासारव आणि लपवाछपवी सुरू आहे, त्याचा तीव्र निषेध करावा. तितकाच कमीच आहे. एवढी मोठी पदवी घेऊन जर घटनात्मक कायद्याला बाजूला सारून खोटे बोलले जात असेल, तर भारतातील सामान्य जनतेने न्यायासाठी कुणाकडे जावे? कुलगुरू महोदयांनी हे लक्षात ठेवावे की, आजची जनता भोळी किंवा अज्ञानी राहिलेली नाही. 

कुलगुरू महोदयांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी जे लेखी स्पष्टीकरण दिले आहे, त्यातीलच काही विसंगती मी पुराव्यासहित समोर आणत आहे:

१. मुलाखत प्रक्रियेतील पारदर्शकता कुठे आहे?

2. 

आपल्या स्पष्टीकरणात आपण म्हटले आहे की, नक्षलवादी भूपतीकडे केवळ कार्यालयीन बाबूगिरीची (प्रशासकीय) जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आपल्याच पत्रानुसार, ९ जुलै २०२६ रोजी झालेल्या कार्यकारी परिषदेच्या बैठकीत 'समन्वयक' नियुक्तीचा निर्णय झाला. त्यानंतर ११ ऑगस्ट २०२६ रोजी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर सरळ मुलाखतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. आलेल्या अर्जांची छाननी करून पात्र उमेदवारांची यादी तयार झाली. परंतु, या पदासाठी एकूण किती उमेदवारांचे अर्ज आले होते, संख्यात्मक आकडेवारी आपण स्पष्ट का केली नाही? येथेच आपली लपवाछपवी स्पष्ट दिसून येते. 

१४ ऑगस्ट २०२६ रोजी प्रा. -कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांच्या अध्यक्षतेखाली मुलाखत समिती गठित करण्यात आली, ज्यामध्ये डॉ. सतीश गोगुलवार व डॉ. नरेश मडावी हे सदस्य होते. संपूर्ण प्रक्रिया आटोपून २९ ऑगस्ट २०२६ रोजी निवड यादी प्रसिद्ध झाली आणि वर्षानुवर्षे रक्ताचा खेळ खेळणाऱ्या जहाल नक्षलवादी भूपतीची गोंडवाना विद्यापीठात 'पेसा (PESA) वनहक्क व ग्रामसभा समन्वयक आणि मुख्य मार्गदर्शक' म्हणून ३ महिन्यांसाठी नियुक्ती करण्यात आली.                  3. भाषणाचे सत्य का लपवले?

आपण आपल्या पत्रात लिहिलंय की, भूपतीकडे ग्रामसभा किंवा प्रशिक्षणात कोणत्याही विषयावर मार्गदर्शन करण्याची जबाबदारी देण्यात आलेली नाही. जर हे सत्य असेल, तर ३ सप्टेंबर २०२६ (गुरुवार) रोजी गडचिरोली येथील नियोजन सभागृहात आयोजित भव्य सभेत हा जहाल नक्षलवादी व्यासपीठावर मुख्य स्थानी कसा विराजमान झाला? तिथे उपस्थित असलेल्या आमचे गाव ग्रामसभेचे अध्यक्ष, सदस्य, सचिव, सरपंच आणि पोलीस पाटील यांच्या भरगच्च सभेत त्याने मुख्य मार्गदर्शक म्हणून भाषण दिले. याचे उत्तर कुलगुरूंच्या स्पष्टीकरणात का नाही? 

4. आमच्या जखमांवर मीठ चोळणारी 'चाणक्य बुद्धी'

ज्या नक्षलवाद्यांनी गडचिरोलीतील ग्रामसभांचे अध्यक्ष, सरपंच आणि सामान्य आदिवासींना लक्ष्य करून त्यांच्या कत्तली केल्या, माता-भगिनींवर अत्याचार करून त्यांचे संसार उद्ध्वस्त केले; आज त्याच नक्षलवादी नेत्याचे स्वागत करण्यासाठी आमच्याच मुला-बाळांना उभे केले जात आहे! कुलगुरू महोदयांची ही कोणती 'चाणक्य बुद्धी' म्हणावी?

याच भूपतीच्या मास्टरमाईंड प्लॅनिंगमुळे गडचिरोली जिल्ह्यात तब्बल ७१ गंभीर गुन्हे नोंद आहेत. आम्ही त्या काळ्या आठवणी कशा विसरायच्या?

• १ मे २०१९ (जांबुळखेडा, कुरखेडा): भूसुरुंग स्फोटात आमचे १५ पोलीस जवान शहीद झाले. एका महिला पोलीस जवानाची विटंबना करण्यात आली. ही क्रूरता कशी विसरावी? 

• २०१० (राणीबोदली, दंतवाडा, छत्तीसगड): सीआरपीएफच्या कॅम्पवर हल्ला करून ७६ जवानांची निर्घृण हत्या करण्यात आली.

• २५ मे २०१३ (झिरम घाटी हत्याकांड): काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेवर २०० हून अधिक नक्षलवाद्यांनी हल्ला करून नंदकुमार पटेल, महेंद्र कर्मा, विद्याचरण शुक्ला यांच्यासह २७ जणांची हत्या केली.

• १९९२ (पिरमिली/लाहेरी परिसर): लाहेरीच्या जंगलात १६ पोलीस जवान शहीद झाले. एका जखमी जवानाला चालता येत नव्हते, तर नक्षलवाद्यांनी त्याला जिवंत पाहून कुऱ्हाडीने गळा कापून ठार केले.

अशा क्रूर इतिहास असलेल्या भूपतीचा या आदिवासी समाजाने काय आदर्श घ्यावा? विद्यापीठाने घेतलेल्या या निर्णयामुळे पीडित कुटुंबांच्या अश्रूंचा आणि भावनांचा अपमान झाला आहे. 

नेते आणि अधिकाऱ्यांना जाहीर आव्हान!

या देशातील राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जनतेला 'किडे-मकोडे' समजू नये. आजचा मतदार राजा जागृत झाला आहे. कोणाला खुर्चीवर बसवायचे आणि कोणाला खाली उतरवायचे, याची पूर्ण जाणीव जनतेला आहे. जर आपण संविधानाचा आणि लोकभावनेचा आदर केला नाही, तर श्रीलंका आणि नेपाळमध्ये जनतेच्या असंतोषामुळे काय झाले, याची उदाहरणे डोळ्यांसमोर ठेवावीत.

कुलगुरू महोदय, जनतेचा तीव्र विरोध पाहून आपण नक्षली भूपतीला मार्गदर्शक पदावरून हटवून केवळ 'बाबूगिरी' (कार्यालयीन काम) दिल्याचा दावा करत आहात. पण लक्षात ठेवा, जिल्हा महाग्रामसभेने ७ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक, गडचिरोली यांना दिलेले पत्र आपण कदाचित वाचले नसावे. [

आमची मागणी एकच आहे:

त्या नक्षली भूपतीला केवळ बाबूगिरीच नाही, तर गोंडवाना विद्यापीठाच्या परिसरात पाऊलही ठेवता येणार नाही, अशी व्यवस्था प्रशासनाने करावी. जोपर्यंत त्याची विद्यापीठातील हकालपट्टी होत नाही, तोपर्यंत आमचे हे आंदोलन अविरत सुरूच राहील.असे शेतकरी व जेष्ठ समाजसेवक पुरस्कृत सिताराम मडावी यांनी पत्रकातून केली आहे.

Post a Comment

0 Comments