मनोज एल खोब्रागडे
✍🏻मुख्य संपादक✍🏻
मो. 8208166961
चंद्रपूर :- आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित खरीप हंगाम पीक परिस्थिती आढावा बैठकीस खासदार प्रतिभाताई धानोरकर उपस्थित राहून जिल्ह्यातील पीक परिस्थिती व शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर प्रशासनाशी सविस्तर चर्चा केली व तात्काळ कारवाईचे निर्देश दिले.
सदर बैठकीत कापूस, सोयाबीन आणि भात पिकांवरील कीड-रोगांच्या नियंत्रणासाठी 'क्रॉपसॅप' किंवा 'डीबीटी'द्वारे ५०% अनुदानावर किंवा मोफत कीटकनाशके पुरवण्याची मागणी केली. तसेच, जुलै २०२६ मधील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी १०.८८ कोटी रुपयांचा मदत निधी त्वरित मंजूर करावा, खरीप २०२५ मधील १,७८२ शेतकऱ्यांचे प्रलंबित १.८० कोटी रुपयांचे विमा दावे तात्काळ मार्गी लावावेत आणि राष्ट्रीयीकृत बँकांनी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे, अशा प्रमुख मुद्द्यांवर भर दिला.
यावेळी राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. अशोक उईके, आमदार मा. श्री. सुधाकर अडबाले, आमदार मा. श्री. किशोर जोरगेवार, आमदार मा. श्री. देवराव भोंगळे, आमदार मा. श्री. करण देवतळे, जिल्हाधिकारी मा. वसुमना पंत, मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. पुलकित सिंग यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments