Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णवेध; दियाची ज्युनियर राष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेसाठी निवड



विश्वनाथ जांभुळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी मो. 9421856931

*एटापल्ली :* लॉयड्स स्पोर्ट्स अकादमीच्या युवा तिरंदाजांनी २३ व्या ज्युनियर आर्चरी स्टेट मीट-२०२६ मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत अकादमीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. नंदुरबार येथे ५ ते ७ सप्टेंबर २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या राज्यस्तरीय स्पर्धेत लॉयड्स स्पोर्ट्स अकादमीच्या खेळाडूंनी उत्साहाने सहभाग घेतला. या स्पर्धेत मुलींच्या गटातून दिया बॅनर्जी, तर मुलांच्या गटातून साहिल अलगमकर आणि आदित्य निगमकर यांनी हेडरी लॉयड्स स्पोर्ट्स अकादमीचे प्रतिनिधित्व केले.


*दिया बॅनर्जीचा अचूक निशाणा; सुवर्णपदकावर मोहोर*


स्पर्धेत दिया बॅनर्जीने आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर वैयक्तिक सुवर्णपदक पटकावले. सातत्यपूर्ण सराव, मेहनत, शिस्त, आत्मविश्वास आणि अचूक लक्ष्यभेदाच्या जोरावर तिने हे यश मिळविले. दियाच्या या दमदार कामगिरीची दखल घेत तिची ज्युनियर राष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. राज्यस्तरीय स्पर्धेतील सुवर्णपदकानंतर राष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळणे ही तिच्या क्रीडा प्रवासातील महत्त्वाची उपलब्धी मानली जात आहे.


तीन खेळाडूंचे राज्यस्तरीय प्रतिनिधित्व हेडरी लॉयड्स स्पोर्ट्स अकादमीच्या दिया बॅनर्जी, साहिल अलगमकर आणि आदित्य निगमकर यांनी राज्यस्तरीय स्पर्धेत अकादमीचे प्रतिनिधित्व करून आपल्या कौशल्याची छाप पाडली. खेळाडूंच्या या कामगिरीमुळे अकादमीमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.


खेळाडूंच्या यशामागे त्यांचा नियमित सराव, कठोर परिश्रम आणि जिद्द यासोबतच प्रशिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचे प्रोत्साहन आणि लॉयड्स स्पोर्ट्स अकादमीचे सातत्यपूर्ण सहकार्य महत्त्वाचे ठरले आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील युवा क्रीडा प्रतिभेला योग्य प्रशिक्षण आणि व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या अकादमीच्या प्रयत्नांना या यशामुळे आणखी बळ मिळाले आहे.


दिया बॅनर्जीच्या सुवर्णपदकासह राष्ट्रीय स्पर्धेसाठी झालेली निवड ही लॉयड्स स्पोर्ट्स अकादमीसाठी अभिमानाची बाब असून, तिच्या पुढील क्रीडा प्रवासासाठी सर्व स्तरातून शुभेच्छा व्यक्त होत आहेत.

Post a Comment

0 Comments