अरविंद बेंडगा
पालघर जिल्हा प्रतिनिधी
7798185755
नानिवली पाटकरपाडा : येथील मानाचे श्री गणेश मंडळ नानिवली पाटकरपाडा यांच्या गणपती बाप्पाची सात दिवसांच्या भक्तिमय उत्सवानंतर उत्साहात विसर्जन मिरवणूक काढण्यात आली.
विसर्जनापूर्वी सकाळी बाप्पाची उत्तर पूजा करण्यात आली. त्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात तसेच ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात गावातून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत महिला, लहान मुले, तरुणांसह ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ग्रामस्थांनी शिस्त व शांतता राखत विसर्जन सोहळा पार पाडला.
मंडळाचे अध्यक्ष नथुराम तांडेल, उपाध्यक्ष स्वप्नील तांडेल, खजिनदार अक्षय तांडेल, सहखजिनदार समीर तांडेल तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक यांच्या मार्गदर्शनाखाली विसर्जन मिरवणूक पार पडली.

Post a Comment
0 Comments