त्रिशा राऊत नागपूर क्राईम रिपोटर. मो. 9096817953
रामटेक-मौदा मार्गावरील नगरधन येथील मोहनलाल शंकरलाल अॅम्रो फूडस प्रा. लि. या राईस मिलच्या मागील तलावात बुडून बिहारमधील तीन मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी 1.30 ते 2 वाजतांच्या सुमारास घडली. गुलशन कुमार (वय 20), मनीष कुमार (वय 18) आणि रुपेश कुमार (वय 18), अशी मूत मजुरांची नांबे आहेत.
रामटेक पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तिन्ही मजूर बिहारमधील कंत्राटदार प्रशांत कुमार यांच्या माध्यमातून मागील 20 ते 22 दिवसांपासून राईस मिलमध्ये हमालीचे काम करीत होते. या मिलमध्ये सुमारे 50 ते 60 हमाल कामाला आहेत. घटनेच्या दिवशी तिघांचीही सकाळची शिफ्ट होती.
शिफ्ट संपल्यानंतर दुपारी सुमारे 1.30 वाजता तिघेही राईस मिलच्या मागील बाजूस असलेल्या तलावात आंचोळीसाठी उतरले. तलावातील खोल पाण्यात तोल गेल्याने तिघेही बुडाले. ही घटना लक्षात येताच अन्य कामगारांनी राईस मिल व्यवस्थापनाला माहिती दिली. त्यानंतर मिल मालकांनी रामटेक पोलिसांना घटनेची माहिती दिली.घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते आणि रामटेकचे पोलीस निरीक्षक राजेशकुमार थोरात यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने शोधकार्य राबविण्यात आले. या शोधकार्यात तिन्ही मजुरांचे मूतदेह तलावातून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर मूतदेह शवविच्छेदनासाठी रामटेक येथील उपजिल्हा रुप्णाल्यात पाठविण्यात आले.
या दुर्दैवी घटनेमुळे राईस मिल परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेचा पुढील तपास रामटेक पोलिस करीत आहेत.

Post a Comment
0 Comments