वर्षावास प्रवचन मालिकेतील तेरावे प्रवचन प्रा. संजय पथाडे यांचे प्रभावी मोलाचे मार्गदर्शन.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो.नं.9420751809.
आलापल्ली :- आज शनिवार दिनांक 26 सप्टेंबर 2026 ला वर्षावास प्रवचन मालिकेतील"तेरावे पुष्प.
भारतीय बौद्ध महासभा, गडचिरोली (दक्षिण)
भारतीय बौद्ध महासभा, गडचिरोली (दक्षिण) महिला समिती, आलापल्ली
भारतीय बौद्ध महासभा, तालुका शाखा, अहेरी
महामाया महिला मंडळ आलापल्ली.
बहुउद्देशीय महिला मंडळ, आलापल्ली.
च्या संयुक्त विद्यमाने संघमित्रा बौद्ध विहार. आलापल्ली येथे धम्ममय,आनंदमय वातावरणात प्रवचन मालिकेचा सोहळा पार मोठया उत्साहात पार पाडला
कार्यक्रमाची सुरुवात आदर्शांची पूजा,बुद्धवंदना,त्रिशरण व पंचशील ग्रहण व भीमस्मरनाणे करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात अनिल मुरमाडे यांनी सुंदर भीमगीताचे गायन गाऊन अधिक प्रसन्न केले.
यानंतर प्रवचन मालिकेतील तेरावे पुष्प "चार ब्रह्मविहार" या विषयावर प्रा. संजय पथाडे अत्यंत सुंदर आनंदमय वातावरणात अभयासपूर्ण प्रवचन केले.
बौद्ध धम्मातील चार ब्रह्मविहार म्हणजे मनाची चार उदात्त आणि कल्याणकारी अवस्था:1. मैत्री सर्व प्राणिमात्रांविषयी प्रेम, सद्भावना व मंगलभावना ठेवणे.2. करुणा दुःखी व पीडित प्राण्यांविषयी दया आणि त्यांचे दुःख दूर करण्याची भावना.3. मुदिता इतरांच्या सुख, यश व प्रगतीत मनापासून आनंद मानणे.4. उपेक्षा सुख-दुःख,लाभ-हानी, मान-अपमान यांत समत्व आणि मानसिक संतुलन राखणे.
लक्षात ठेवण्याची सोपी पद्धत
मैत्री — सुखाची इच्छा.
करुणा — दुःख दूर करण्याची इच्छा.
मुदिता — दुसऱ्याच्या सुखात आनंद
उपेक्षा — समत्वाची भावना
यांना “ब्रह्मविहार” असे म्हणतात, कारण या भावनांचा विकास मनाला अत्यंत उदात्त, निर्मळ आणि व्यापक बनवतो, असे प्रतिपादन केले.
अन्नदान सुनिल अंबुजी खोब्रागडे व सहकुटुंब यांनी दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रमोद मेश्राम तर कार्यक्रमाचे आभार शंकुलताताई दुर्गम यांनी केले.
कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांना पुस्तक भेट देऊन सन्मान करण्यात आले आहे.
या प्रवचन मालिकेला बहुसंख्य बौध्द उपासक उपासिका उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यात बहुसंख्य उपासक तथा उपासीका यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.

Post a Comment
0 Comments