विश्वनाथ जांभुळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी मो. 9421856931
एटापल्ली :- एटापल्ली तालुक्यातील मरपल्ली, वासामुंडी, बारसेवाडा, मचली आणि कोकोबंडा जंगल परिसरात वाघाचा वावर असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
शनिवार दि. १२ सप्टेंबर रोजी गाय-बैल राखण्यासाठी जंगलात गेलेल्या महेंद्र भाऊजी दुर्वा (वय २३, रा. मरपल्ली) यांच्या समोर अचानक वाघ आला. प्रसंगावधान राखत महेंद्र यांनी जीव वाचवण्यासाठी झाडावर चढून अख्खी रात्र झाडावरच काढली.
रात्रभर शोध घेऊनही तो न सापडल्याने गावात तणावाचे वातावरण होते. रविवारी सकाळी दि. १३ सप्टेंबर रोजी ग्रामस्थांनी मोठी शोधमोहीम राबवून सकाळी ९ वाजता त्यांना सुखरूप शोधून काढले.
या घटनेनंतर वनविभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा तालुका काँग्रेस नेते प्रज्वल नागूलवार व समस्त ग्रामस्थ मरपल्ली यांनी दिला आहे.


Post a Comment
0 Comments