Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

पोलिस प्रशासनातर्फे अहेरीत गणेश चतूर्थी निमित्त शांतता व सुव्यवस्था जनसंवाद कार्यक्रम संपन्न



व्येकटेश चालुरकर 

तालुका प्रतिनिधी अहेरी 

9209982212


अहेरी, १३ सप्टेंबर २०२६: आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अहेरी परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने आज जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

प्राणहिता अहेरीचे अपर पोलीस अधीक्षक हर्षवर्धन, उपविभागीय पोलीस अधिकारी हेमंत चांदेवार आणि अहेरीचे पोलीस निरीक्षक हर्षल एकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. या बैठकीला परिसरातील ३७ सार्वजनिक गणेश मंडळांचे अध्यक्ष, पोलीस पाटील, प्रतिष्ठित नागरिक आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची रूपरेषा आणि प्रशासकीय सूचना नियोजनाबाबत मार्गदर्शन पोलीस निरीक्षक हर्षल एकरे यांनी १३ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना अहेरी परिसरातील नियोजनाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

 नियमांचे पालन: पोलीस उपविभागीय अधिकारी हेमंत चांदेवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रशासनाच्या सर्व सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले.

  विसर्जन कालावधी: गणेश विसर्जन २३, २४ आणि २५ सप्टेंबर रोजी पार पाडावे, असे निर्देश देण्यात आले.

  कार्यक्रमाची माहिती: दहा दिवस चालणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा निश्चित करून ती संबंधित पोलीस समन्वयकांकडे दूरध्वनी किंवा लेखी स्वरूपात त्वरित कळवावी, जेणेकरून सुरक्षेसाठी (प्रोटेक्शन) व बंदोबस्तासाठी कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले.

Post a Comment

0 Comments