Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या वृत्तांकनासाठी पत्रकारांनी कागदपत्रे सादर करावीत

 



प्रमोद एन. चिंतलवार 

तालुका प्रतिनिधी गडचिरोली 

मो. नं. 9405133420


गडचिरोली : नागपूर पदवीधर मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक–२०२६ च्या मतदान व मतमोजणी केंद्रांवरील वृत्तांकनासाठी प्राधिकारपत्र देण्यात येणार आहे. यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील पात्र दैनिक वृत्तपत्रे व इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांचे जिल्हा/तालुका प्रतिनिधी तसेच अधिस्वीकृतीधारक पत्रकारांनी आवश्यक कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाने केले आहे.


प्राधिकारपत्रासाठी संबंधित वृत्तसंस्थेचे अधिकृत शिफारसपत्र सादर करणे आवश्यक आहे. केवळ मतदानाच्या वृत्तांकनासाठी २ पासपोर्ट आकाराची छायाचित्रे, तर मतदानासह नागपूर येथील मतमोजणीच्या वृत्तांकनासाठी ३ पासपोर्ट आकाराची छायाचित्रे सादर करावी लागतील.


प्रतिनिधीचे नाव, पदनाम आणि वृत्तसंस्थेचे नाव मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये नमूद करणे आवश्यक आहे. छायाचित्रांच्या झेरॉक्स प्रती स्वीकारल्या जाणार नाहीत.


या प्रक्रियेत वेब पोर्टल व यूट्यूब चॅनेलच्या प्रतिनिधींचा समावेश असणार नाही.


आवश्यक कागदपत्रे जिल्हा माहिती कार्यालय, गडचिरोली येथे १ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजेपर्यंत सादर करावीत. निर्धारित मुदतीनंतर प्राप्त होणारी नावे स्वीकारली जाणार नाहीत.


— जिल्हा माहिती अधिकारी, गडचिरोली

Post a Comment

0 Comments