भाग्यश्रीताई आत्राम (हलगेकर) यांची प्रमुख उपस्थिती.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
अहेरी : प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, अहेरी पाठशाळेच्या वतीने रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.या कार्यक्रमाला *माजी जिल्हा परिषद अध्यक्ष,तथा गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्या भाग्यश्रीताई आत्राम (हलगेकर या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.
कार्यक्रमाला ब्रह्माकुमारी गडचिरोलीच्या मुख्य प्रशासिका आदरणीय नलिनीदीदी जी, तसेच नेत्रादीदी व संगीतादीदी, चामोर्शी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कुमदोते मॅडम, ज्येष्ठ नागरिक भोसले सर आणि श्रीमती लक्ष्मीबाई कुळमेथे यांच्यासह मान्यवर व नागरिक उपस्थित होते.
रक्षाबंधनाच्या निमित्ताने आध्यात्मिक संदेश, बंधुभाव, प्रेम, शांती आणि संस्कारांचे महत्त्व उपस्थितांना पटवून देण्यात आले. उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तसेच रक्षासूत्र बांधून रक्षाबंधनाचा उत्सव साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन अहेरी पाठशाळेच्या बी.के. वंदना बहन आणि शकुंतला माताजी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ब्रह्माकुमारी परिवाराच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Post a Comment
0 Comments