Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

नागेपल्ली येथील श्रेया अकुलवार यांच्या उपचारासाठी राजे अम्ब्रिशराव महाराजांची आर्थिक मदत.



ऑपरेशनसाठी आर्थिक अडचण; भाजप पदाधिकाऱ्यांनी राजे अम्ब्रिशराव महाराजांकडे मांडली कुटुंबाची व्यथा.


मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.

अहेरी :- नागेपल्ली येथील श्रेया मंगेश अकुलवार या युवतीवर सध्या पोटाच्या आजारामुळे तेलंगणा राज्यातील करीमनगर येथील केलवीन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तिच्या प्रकृतीवर उपचारासाठी तसेच पुढील ऑपरेशनसाठी मोठ्या आर्थिक रकमेची आवश्यकता असल्याने कुटुंबीयांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने उपचाराचा खर्च करणे कुटुंबाला कठीण जात असल्याची माहिती नागेपल्ली येथील भाजप पदाधिकाऱ्यांनी माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री गडचिरोली राजे अम्ब्रिशराव महाराज यांना दिली.


श्रेया अकुलवार यांच्या आजाराची तसेच कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीची माहिती मिळताच राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी मदतीचा हात पुढे केला. त्यांच्या वतीने श्रेया यांच्या उपचारासाठी आर्थिक मदत करण्यात आली. या मदतीमुळे उपचाराच्या काळात कुटुंबाला मोठा आधार मिळाला असून, संकटाच्या काळात मदतीसाठी पुढे आल्याबद्दल कुटुंबीयांनी राजे अम्ब्रिशराव महाराज यांचे आभार व्यक्त केले.


श्रेया यांच्यावर सध्या केलवीन हॉस्पिटल, करीमनगर येथे उपचार सुरू असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ऑपरेशन करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. ऑपरेशनसह पुढील उपचारासाठी मोठा खर्च अपेक्षित असल्याने कुटुंबीय आर्थिक विवंचनेत होते. अशा परिस्थितीत नागेपल्लीतील भाजप पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्यापर्यंत ही बाब पोहोचवली.


सामान्य नागरिक, गरजू कुटुंबे आणि संकटात सापडलेल्या व्यक्तींना शक्य ती मदत मिळवून देण्यासाठी स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकारी सातत्याने प्रयत्न करत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. श्रेया यांच्या उपचारासाठी मिळालेल्या मदतीमुळे कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.


प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते किशोर धकाते,नागेपल्ली भाजप शहर अध्यक्ष सारय्या गड्डमवार जिल्हा सचिव अभिजित शेंडे, दिपक तोगरवार, अंकुश शेंडे,सागर बिट्टीवार , मलेश तोटावार तसेच अकुलवार यांचे नातेवाईक व नागेपल्लीतील सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..

Post a Comment

0 Comments