Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

जि. प. प्राथमिक शाळा चौडमपल्ली येथे समूह साधन केंद्र पेरमिलीची शैक्षणिक शिक्षण परिषद उत्साहात संपन्न.




विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसह विविध शैक्षणिक उपक्रमांवर सखोल विचारमंथन.


मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809


पेरमिली: महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागांतर्गत 'माझी शाळा, सुंदर शाळा, गुणवंत शाळा' या संकल्पनेला अनुसरून समूह साधन केंद्र पेरमिली (ता. अहेरी, जि. गडचिरोली) अंतर्गत स्थानिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौडमपल्ली येथे शैक्षणिक शिक्षण परिषदेचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख डॉ. दिवाकर सोमाजी नारनवरे हे प्रामुख्याने उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून चौडमपल्ली शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पेंटा आत्राम, ग्रामपंचायत सदस्य बंडू आत्राम, मादी आत्राम, गावाचे पोलीस पाटील तसेच ज्येष्ठ मुख्याध्यापक मुजुमकर सर, आरे सर, बापू आत्राम सर, लेकुरे सर, देवाजी दुर्गे सर व सुनील तुरकर सर यांची विशेष उपस्थिती लाभली.

गुणवत्तापूर्ण शिक्षण ही काळाची गरज असून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शिक्षकांनी नवनवीन शैक्षणिक तंत्रज्ञान, समृद्ध साहित्य आणि विविध अध्ययन संकल्पनांचा प्रत्यक्ष वर्गअध्यापनात वापर करावा, यावर उपस्थित मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनात विशेष भर दिला.

या शिक्षण परिषदेदरम्यान निपुण भारत अंतर्गत 'निपुण महाराष्ट्र' - पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान (FLN) कृती कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी, अध्ययन निष्पत्तीवर आधारित आदर्श पाठ व नमुना सादरीकरण, शाळा गुणवत्ता वृद्धीचे प्रयत्न, शालेय व्यवस्थापन समिती (SMC) पुनर्गठन तसेच शैक्षणिक साहित्याचे व्यवस्थापन व वापर यांसारख्या महत्त्वाच्या शैक्षणिक विषयांवर सुलभकांद्वारे सखोल विचारमंथन व मार्गदर्शन करण्यात आले.

याशिवाय PGI व UDISE PLUS चा आढावा, समग्र प्रगती पत्रक (HPC), डॉ. जयंत नारळीकर गणित व विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रम, इयत्ता ६ वी व्यावसायिक शिक्षण अंमलबजावणी आणि कार्यालयीन माहिती संकलन यावरही सविस्तर चर्चा करण्यात आली.

या परिषदेला केंद्रांतर्गत येणाऱ्या शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व सुलभक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘एकच विचार, एकच कृती – गुणवत्तापूर्ण शिक्षण आपली जबाबदारी’ हा संकल्प व्यक्त करून परिषदेचा समारोप करण्यात आला.

Post a Comment

0 Comments