Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

अहेरी आगाराला मिळाल्या ५ नवीन बसेस; परिवहन मंत्र्यांचे मनःपूर्वक आभार.



मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.

अहेरी : अहेरी आगाराला प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून अहेरी आगारात सेवेसाठी ५ नवीन बसेस उपलब्ध झाल्याबद्दल अहेरी शहरातील नागरिक व शालेय विध्यार्थ्यांना प्रवाशांच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

अहेरीसह ग्रामीण व दुर्गम भागातील प्रवाशांना सुरक्षित, नियमित आणि आरामदायी प्रवासाची सुविधा मिळण्यासाठी नवीन बसेसची आवश्यकता होती. या मागणीची दखल घेत अहेरी आगाराला ५ नवीन बसेस उपलब्ध करून दिल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री तसेच संबंधित एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार.

नवीन बसेसमुळे अहेरी आगाराच्या वाहतूक व्यवस्थेला बळ मिळून ग्रामीण भागातील प्रवाशांना अधिक चांगली सेवा मिळेल, अशी अपेक्षा आहे.या वेळी परिवहन मंत्री यांचे कौतुक केले जात आहे.

Post a Comment

0 Comments